लातूर शहर भाजपाचा सहभाग
११ हजार घरात लावणार तिरंगा
लातूर/प्रतिनिधी:शासनाच्या वतीने राबविल्या जाणाऱ्या 'हर घर तिरंगा' अभियानात लातूर शहर जिल्हा भारतीय जनता पक्ष सक्रियपणे सहभागी होणार आहे. या अंतर्गत शहरातील किमान ११ हजार घरांपर्यंत पोहोचून अभियानाविषयी जनजागृती करून तिरंगा लावण्याचा निर्धार पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत करण्यात आला.
स्वातंत्र्यदिनानिमित्त 'हर घर तिरंगा' हे अभियान राबविले जात आहे.केंद्र व राज्य शासनासह प्रशासनाकडूनही या अभियानाची जय्यत तयारी केली जात आहे. प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वज उपलब्ध करून देण्यात आले आहेत.या अभियानाचे मराठवाडा संयोजक आ.संभाजीराव पाटील निलंगेकर,आ.अभिमन्यू पवार,
आ.रमेशअप्पा कराड, शहर जिल्हाध्यक्ष गुरुनाथ मगेयांच्या नेतृत्वात या अभियानात शहर जिल्हा भाजपा देखील सक्रियपणे सहभागी आहे.दि.१३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत भाजपा लातूर शहर जिल्हा हे अभियान राबवणार आहे.
या अभियानाचे शहर जिल्हा संयोजक ॲड.दिग्विजय काथवटे व सहसंयोजक श्रीराम कुलकर्णी यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली.या बैठकीस,प्रविण सावंत,संघटन सरचिटणीस मनिष बंडेवार,सरचिटणीस शिरीष कुलकर्णी, प्रवीण सावंत, छत्रपती शिवाजी महाराज मंडल संयोजक व्यंकटेश कुलकर्णी, सहसंयोजक संजय सुरवसे,स्वामी सरस्वती दयानंद मंडल संयोजक हनुमंत कुलकर्णी,
सहसंयोजक पवन आलटे,
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मंडल संयोजक सागर ततेपुरे,
सहसंयोजक शुभम स्वामी, छ संभाजी राजे मंडळ संयोजक दामू शिंदे,सहसंयोजक दत्ता कोंपले,
बसवेश्वर मंडल संयोजक ओम राठोड,सहसंयोजक बाळू कमाने, सिद्धेश्वर मंडल संयोजक केदार वर्मा,सहसंयोजक रवी लवटे, डॉ.
बाबासाहेब आंबेडकर मंडल संयोजक किशन बडगिरे, सहसंयोजक दुर्गेश चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.
'हर घर तिरंगा' अभियानाची घरोघर जाऊन माहिती देणे, जनजागृती करणे,ध्वज लावण्यासंदर्भातील माहिती सांगणे,तिरंगा ध्वज कोठे-कोठे उपलब्ध आहे ? या संदर्भात माहिती देणे,आदी उपक्रम या अभियानांतर्गत राबवले जाणार आहेत.या माध्यमातून शहरातील किमान ११हजार घरापर्यंत पोहोचून तिरंगा लावण्यात येणार असल्याची माहिती अभियानाचे शहर जिल्हा संयोजक ॲड.दिग्विजय काथवटे यांनी दिली.