लातूर'नशे'च्या गर्देत..!
लातुरमध्ये युवकास झोपेच्या गोळ्यांसह केली अटक
कर्नाटकातून गोळ्यांचा पुरवठा करणारे रॅकेट सक्रिय
लातूर:लातूर मध्ये शैक्षणिक झोन म्हणुन ओळखल्याजाणार्या उद्योग भवन परिसरात अवैध धंद्यांनी कहर केला आहे.काहि महिन्या आगोदर 'मुन्ना'गैंग ने दहशत पसरवत विद्यार्थ्यांना मारहाण करून त्यांच्याकडून पैशे उकळले जात होते.बरीच ओरड झाल्यानंतर त्यांच्यावर कार्यवाही करण्यात आली.यापुर्वीही या गैंग च्या नावावर गंभीर गुन्हे दाखिल होते.त्यानंतर पोलिसांनी कार्यवाही केली.आता तर लातूर 'नशे'च्या गर्देत अडकल्याचे आता स्पष्ट होत आहे. सोमवार दि.२९ ऑगस्ट रोजी संध्याकाळच्या दरम्यान शहरात झोपेच्या गोळ्या काही मेडिकलवर, टपरीवरून विक्री होत असल्याची धक्कादायक माहिती खबऱ्यामार्फत पोलिसांना मिळाली.त्याअनुशंगाने सापळा रचून पोलीस आणि अन्न औषध प्रशासन कार्यालयाच्या पथकाने झोपेच्या ३५० गोळ्यांसह एका युवकाला अटक केली. असून, त्यांच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
"शेजारच्या कर्नाटक राज्यातून चोरट्या मार्गाने झोपेच्या, गुंगीच्या गोळ्यांचा पुरवठा करणारे रॅकेट सक्रिय असल्याच्या वृत्ताला पोलिसांनीही दुजोरा दिला आहे. लातूरलगत असलेल्या सीमाभागातून या गोळ्या लातुरात येत असल्याची माहिती पोलिसां मिळाली त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे."
- निखिल पिंगळे, पोलीस अधीक्षक
या बाबत मिळालेल्या माहितीच्या आधारे शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण राठोड यांनी सूत मिल रोड परिसरात एका युवकाला पकडण्यात आले. तो झोपेच्या गोळ्या विक्री करत असल्याचे आढळून आले.घटनास्थळी मारलेल्या छाप्यात चाकूर तालुक्यातील दापक्याळ येथील सुमित संतोष कासले (वय २२) हा झोपेच्या गोळया विक्री करत होता. दरम्यान, सापळा रचून पोलीस आणि अन्न औषध प्रशासन कार्यालयाच्या पथकाने संयुक्तपणे त्यास ताब्यात घेत पंचनामा केला व त्या ठिकाणावरून १० एमजीच्या ३५० गोळ्यांचे दोन बॉक्स जप्त करण्यात आले आहेत. आता सूत मिल रोड परिसरात केलेली ही कारवाई दुसऱ्यांदा असुन यामुळे आता पोलिसांनी हि घटना गांभीर्याने घेण्याची अवश्यकता असुन,त्या परिसरात उशिरापर्यंत चालू असलेले काॅफी शाॅप,पानटपर्या,हाॅटेल यांच्यावर कार्यवाही करणे आता अवश्यक बनले आहे.कर्नाटकातून गोळ्यांचा पुरवठा करणारे रॅकेट सक्रिय झाले असुन आता त्यांचे पाळेमुळे खोदने अवश्यक बनले आहे.पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून सुमित कासले याच्याविरोधात गुरनं. ३७४ / २०२२ कलम २७६, ३२८, ३३६ भादंविसह कलम ८ (क), २१, २२ (२२), पदार्थ अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पोलीस निरीक्षक पाटील करत आहेत.