कृषि सहाय्यकांचे राज्यव्यापी आंदोलन
संगणक दया हो…कृषि सहाय्यकांचा टाहो…
मागण्या मंजूरीसाठी ऑनलाईन कामे बंद करण्याचा इशारा
लातूर प्रतिनिधी : कृषि सहाय्यक हा कृषि विभागाचा कणा आहे. आधुनिक काळात शेतकऱ्यांना डीजीटल माध्यमातून विविध सुविधा तात्काळ देण्यासाठी मोबाईल, संगणक तसेच ऑनलाईन कनेक्टीवीटीसाठी डेटा या सर्व बाबी गरजेच्या आहेत. परंतू शासन स्तरावर या सुविधा देण्यासाठी असलेली अनास्था ही कृषि सहाय्यकांच्या कार्यक्षमतेला मारक ठरत आहे. शेतकरी व अधिकारी तसेच प्रशासनाच्या मधील दुवा असणरा कृषि सहाय्यक या डीजीटल सुविधा मिळल नसल्याने भरडत चालला आहे. कृषि सहाय्यक संघटनेच्यावतीने अनेक वेळा मागणी करुन ही शासन स्तरावर दखल न घेतल्यामुळे संघटनेने आंदोलन करण्याची भूमिका घेतली आहे.
डीजीटल माध्यमातून शेतकऱ्यांची सर्व कामे करण्यासाठी प्रशासन आग्रही असताना कृषि सहाय्यकांना डिजीटल माध्यमेच उपलब्ध करुन न दिल्याने सर्व कामे ठप्प होण्याच्या मार्गावर आहेत. अपुऱ्या सुविधामुळे वेळेत काम करणे व शेतकऱ्यांना सुविधा देण्याच्या कामात निरंतरता राहत नाही यामुळे अनेकवेळा शेतकरी व कृषि सहाय्यक यांच्यात वाद उदभवतात, तसेच काम वेळेत करावे यासाठी अधिकारी आग्रही असतात परंतू सुविधे अभावी अधिकारी व कृषि सहाय्यक यांच्यातही विनाकारण तणावाची परिस्थिती निर्माण होत आहे. यासर्व बाबींचा विचार करुन कृषि सहाय्यक संघटनानी निवेदन देवून ऑनलाइन काम गतीने पुर्ण व्हावे यासाठी विविध मागण्या केल्या आहेत. यामध्ये प्रत्येक कृषि सहाय्यकास लापटॉप, मोबाईल, डिजीटल डाटा व व्यवस्थापन खर्च म्हणुन प्रती महिना 1500 रुपये देण्यात यावे आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. कृषि सहाय्यक संघटनेच्या वतीने करण्यात आलेल्या मागण्यांची दखल घेवून प्रशासनाच्या वतीने तातडीने मागण्या मंजूर कराव्ययात अशी मागणी करण्यात आली आहे.
या मागण्या मंजूरी साठी संघटनेच्या वतीने 15 ऑगस्ट रोजी ध्वजारोण सोहळा झाल्यानंतर राज्यातील सर्व कृषि ससहाय्यक एकाच वेळी सर्व कार्यालयीन व्हॉटसॲप ग्रुप मधून बाहेर पडणार आहेत. 22 ऑगस्ट रोजी सर्व विभागीय कृषि सहसंचालक यांना विभागीय कार्यकारिणीच्या वतीने निवेदन देण्यात येणार आहे. विभागीय कार्यालयासमोर त्या विभागातील स्थानिक जिल्हयाचे सर्व कृषि सहाय्यक धरणे आंदोलन करणार असल्याचा इशार देण्यात आला आहे. तसेच 15 सप्टेंबर पासून सर्व ऑनलाइल कामावर बेमुदत कालावधीसाठी बहिषकार करण्यात येणार असल्याची माहिती कृषि सहाय्यक संघटनेचे लातूर जिल्हध्यक्ष ओंकार माने यांनी दिली आहे.
कृषि सहाय्यक संघटनेच्यावतीने वरील विविध मागण्यांचे निवेदन लातूरचे जिल्हाअधिक्षक कृषि अधिकारी, दत्तात्र्य गावसाणे यांना देण्यात आले. यावेळी संघटनेचे लातूर जिल्हध्यक्ष ओंकार माने, जिल्हा सचिव शरद धनेगावे, अमोल पाटील, दिलीप कबाडे, सरोदे, सुनिल घारोळे, विष्णु कलमे, टेकाळे, कदम, लातूर तालूका अध्यक्षा श्रीमती ज्योती पवार, अजीत देशमुख, गोपीचंद सुर्यवंशी, डीण् बी. शिंदे, गुलाब शेख, संजयसिंह चव्हाण, दत्तात्रे गुणाले, संदीप पाटील, शिवाजी सुर्यवंशी, बाबासाहेब सुर्यवंशी, संभाजी सुर्यवंशी, पंडगे, श्रीमती मनिषा भोगे, श्रीमती बनशेळकीकर, श्रीमती विश्वकर्मा, श्रीमती नागरगोजे, श्रीमती शेख, श्रीमती गीरी, श्रीमती मोदी आदींसह संघटनेचे पदाधिकारी सभासदांची उपस्थिती होती.
कृषि सहाय्यकांच्या मागण्या योग्य, मागण्यांच्या पूर्ततेसाठी शासनस्तरावर पाठपूरवठा करणार – जिल्हाकृषि अधिक्षक दत्तात्र गावसाणे
शेतकऱ्यांना जलद गतीने सोयी सुविधा मिळाव्यात व त्यांची कामे तातडीने व्हावीत यासाठी शासन डीजीटल (ऑनलाइन) माध्यमातून काम करण्यासाठी आग्रही आहे. कृषि सहाय्यकांच्या वतीने करण्यात आलेल्या मागण्या योग्य असून त्यांच्या मागण्या मंजूर व्हाव्यातयासाठी शासनस्तरावर सकारात्मक पाठपुरावा करत आहोत. कृषि सहाय्यक यांनी आपली भूमिका निवेदनाव्दारे व्यक्त केली आहे. शेतकऱ्यांना कोणतीही अडचण होणार नाही याची काळजी घेवून कृषि सहाय्यक यांनी ऑनलाइन काम बंद न करण्याचे आवाहन जिल्हाकृषि अधिक्षक दत्तात्र गावसाणे यांनी केले आहे.
Tags:
LATUR