Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच बडतर्फ

गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर  ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच बडतर्फ



उदगीर(संगम पटवारी) तालुक्यातील लोणी ग्रामपंचायत सरपंच उषा यमुनाजी भुजबळे व उपसरपंच वैजनाथ बिरादार यांना अखेर बडतर्फ करण्यात आले असुन त्यांच्यावर पदभार स्विकारल्या पासुन भ्रष्टाचाराचे व पदावर राहून बेजबाबदार राहील्याचा ठपका ठेवत, अप्पर विभागीय आयुक्त अविनाश पाठक यांनी त्यांना अपात्र ठरविले आहे.
लोणी येथील सामाजिक कार्यकर्ते साधूराम कांबळे यांनी ग्रामपंचायत मध्ये होत असलेल्या अनागोंदी कारभाराच्या विरोधाय आवाज उठवित ग्रामपंचायतील भ्रष्टाचार थांबविण्याचे काम करत आहेत. गावातील ग्रामपंचायत मध्ये सरपंच पती व उपसरपंच बिरादार यांचा मनमानी कारभार सुरु असल्यामुळे कांबळे यांनी उदगीर पंचायत समिती कडे रितसर तक्रार दिली. मात्र राजकीय दबावामुळे हे प्रकरण दाबण्यात येत होते. त्यामुळे साधूराम कांबळे यांनी सर्व पुराव्यानिशी मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद लातुर यांच्याकडे तक्रार दाखल करीत ॲड.वैजनाथ  कुंभार,ॲड.विशाल कुंभार यांच्या मार्फत आपली बाजु माडली असता सर्व पुराव्याची तपारणी, पंचनामा केल्या नंतर सरपंच व उपसरपंच दोषी असल्याचे सिध्द झाले. तर सरपंच व उपसरपंच यांची बाजू अँड. यु. यु. मोमले यांनी माढली मात्र प्राप्त पुरावे , पंचनामा अहवाल पाहता सरपंच व उपसरपंच दोषी असल्यामुळे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम ३८/१ नुसार दोषी ठरवित अपात्र करण्यासाठी दि. २२ जून २०२२ रोजी अप्पर विभागीय आयुक्त यांच्याकडे प्रस्ताव दाखल केला होता. 
अप्पर विभागीय आयुक्त औरंगाबाद यांनी अर्जदार व गैरअर्जदार या दोघांचीही बाजू ऐकून सर्व कागदपत्रांची सत्यता तपासल्यानंतर अर्जदारांनी केलेले आरोप सिद्ध झाल्यानंतर सरपंच व उपसरपंच यांना दि. २२ ऑगस्ट २०२२ रोजी अपात्र केले आहे.
Previous Post Next Post