गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
आली रे आली ,आता 'गुरूजी'ची बारी आली..
शिरुर अनंतपाळ हद्दीत जुगार अङयावर धाडी !
दोन ठिकाणी कारवाई, ११ जुगाऱ्यांवर गुन्हा दाखल; ४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त
लातूर/ शिरुर अनंतपाळ :
"मागील काही महिन्यापासुन सहायक पोलीस अधीक्षक निकेतन कदम हे अतिशय आक्रमक पणे,काम करत आहेत,काही दिवसापुर्वी रेणापूर येथिल रेणुका क्लब वर धाड मारुन खेळणार्यांना बेदम मारहाण करण्यात आली होती.या मारहाणीचे फोटो व्हायरल झाल्यानंतर सर्व बाजूने त्यांच्यावर टिकेची झोड उटल्यानंतर मा अमित देशमुख यांनी त्यांच्यावर कार्यवाही साठी विधीमंडळात प्रश्न उपस्थित करण्यात आला.त्यानंतर त्यांनी स्वत:ची कामाची शैली बदलत आता ही कार्यवाही करण्यात आली.त्यामुळे आता कासारशिरशी हद्दीत कोराळी येथे एका अमदाराच्या शेतात परवानाधारक क्लब वर रोज शेकडोच्या संखेने आजुबाजुच्या भागातून लोक खेळण्यासाठी येतात.तेथे मटक्याचा बादशाह असलेला' गुरुजी'बसुन आपले साम्राज्य चालवतो .आणि आता तर सर्व पोलिसांना 'बाॅडी प्रोटेक्टर'देण्यात आल्यामुळे पोलिस कसल्याही प्रकारच्या प्रति हल्यास तयार आहेत.त्यामुळे आता आली रे आली आता 'गुरूजी'ची बारी आली आशी संपुर्ण जिल्ह्यात चर्चा होवू लागली आहे"
शिरुर अनंतपाळ हद्दीत येणाऱ्या थेरगाव व शिवपूर येथे तिर्रट जुगार मोठ्या प्रमाणात सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर आल्यानंतर सहायक पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांनी शनिवारी दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास नळेगाव ते शिरुर अनंतपाळ जाणाऱ्या रोडच्या पुर्वेस (शिवपुर) हरीश्चंद्र सूर्यवंशी याच्या हॉटेलवर धाड टाकली.
यावेळी हॉटेलमध्ये, विनोद नागनाथ सूर्यवंशी (वय ३६, रा. शिवपुर), अशोक लक्ष्मण सूर्यवंशी (वय ५७, रा. शिवपुर), परमेश्वर बाबुराव माडे (वय ३८, रा. जोगाळा), रवींद्र हरिश्चंद्र धुमाळ (वय ३५, रा. जोगाळा), वसंत प्रल्हाद चात्रे (वय ५०, रा. शिवपुर), संदीपान रामराव महाके (वय ५५, स. शिवपुर), शंतनु संजय पाटील (वय २८, रा. हुडगेवाडी), गणेश उद्धव चात्रे (वय ४१, शिवपुर) हे तिर्रट जुगार खेळताना आढळून आले. या सर्व आरोपींना अटक करुन घटनास्थळावरुन ३५ हजार रुपये रोख, ६ मोबाईल, ४ मोटार सायकली, -एक कार व जुगाराचे साहित्य असा ४ लाख ६९ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल या ठिकानावरुन जप्त करण्यात आला. या प्रकरणी शिरुर अनंतपाळ पोलिसांत गुरनं १६४/ २२ कलम १२ अ, मुंबई जुगार कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या धाडीनंतर निकेतन कदम यांनी लागलीच येथून जवळच असलेल्या थेरगाव येथील वामन शिंदे याच्या दुकानात धाड टाकली असता येथे बेकायदेशिरपणे पत्यांवर पैसे लावुन मिलन डे नावाचा जुगार खेळताना, विश्वनाथ महादेव वाघमारे (वय २९), बालाजी वामन शिंदे (वय ३६) आणि पांडुरंग वामन शिंदे (वय ३२, सर्व रा. थेरगाव) हे आढळुन आले. घटनास्थळावरुन जुगाराचे साहित्य व रोख रक्कम असा ९ हजार ९९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या संदर्भात शिरुर अनंतपाळ पोलिसांत गुरनं १६५ / २२ कलम १२ अ मुंबई जुगार कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.