अंबानी कुटुंबीयांना पुन्हा एकदा जिवे मारण्याची धमकी..!
मुंबई : मुकेश अंबानी यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याने तीन तासात अंबानी कुटुंबीयांना ठार करणार असल्याची धमकी दिली असल्याचे वृत्त संपुर्ण महाराष्ट्रात वार्यासारखे पसरले आणि एकच खळबळ उडाली .रिलायन्स उद्योग समूहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी आणि कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. अज्ञात व्यक्तीने आत्तापर्यंत आठ वेळेस धमकी दिली असल्याचे समोर आले आहे. अँटिलिया प्रकरणानंतर दुसऱ्यांदा धमकी आल्यामुळे पोलीस सतर्क झाले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी तातडीने तपास सुरू केली आहे. या फोन कॉलमुळे खळबळ उडाली आहे.