लातूरमध्ये 'हर घर तिरंगा' अभियानाअंतर्गत स्कूल बस रॅली
प्रादेशिक परिवहन कार्यालय व लातूर जिल्हा विद्यार्थी वाहतूक संघटना यांच्या पुढाकाराने
लातूर शहरांमध्ये 75व्या अमृतमहोत्सवा निमित्त हर घर तिरंगा अभियानांतर्गत प्रादेशिक परिवहन कार्यालय व लातूर जिल्हा विद्यार्थी वाहतूक संघटना यांच्या विद्यमानाने दिनांक 14 ऑगस्ट रोजी शहरामध्ये रॅली काढण्यात आली. यामध्ये तब्बल शंभर ते दीडशे स्कूलबस नी सहभाग नोंदविला. सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री अशितोष बारकुले यांनी स्कूल बस धारकांनी संबोधित करताना सांगितले की सर्वांनी परवानाधारक असणे आवश्यक आहे तसेच त्यांच्या बरोबर बेच असणेही तेवढेच आवश्यक असून दंड भरावा लागतो त्यामुळे सर्वांनी ब्याच नंबर काढून घेण्याचे आवाहन केले तसेच लातूर जिल्हा विद्यार्थी वाहतूक संघटनेचे अध्यक्ष श्रीकृष्ण पाडे यांनी बॅच काढून घेण्याचे आश्वासन दिले व वेळोवेळी अधिकाऱ्यांनी सहकारी केल्याचेही त्यांनी सांगितले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी अशितोष बारकुल पुरवले श्री मनोज लोणारी ,रोहित कोरवले ,रोहित मांगडेे, अर्जुन मे लगिनीी, अनुराज सावळे ,रमेश दुरांडे ,या अधिकारी व कर्मचाऱ्यांसह लातूर जिल्हा विद्यार्थी वाहतूक संघटना अध्यक्ष श्रीकृष्ण पाडे ,संदीप वाघ, सुरेश, सर्व दे गोविंद पाटील, विनोद करतिथेे, सतीश भाकरे यांनी पुढाकार घेतला