गणेशोत्सव मंडळांना कोविड-१९ लसीकरण आयोजन करण्याचे मनपाचे आवाहन
दि. .३१ ऑगस्ट ते ९ सप्टेंबर २०२२ या कालावधीत सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. या कालावधीत महानगरपालीकेमार्फत गणेश मंडळाच्या सहकार्याने विवीध भागात कोविड-१९ प्रतिबंधक लसीकरण सत्रे आयोजीत करण्यात येणार आहेत.
तरी ज्या गणेशमंडळांना परीसरातील नागरीक व भाविकांसाठी कोविड-१९ प्रतिबंधक लसीकरण सत्र आयोजीत करावयाचे आहे अश्या ईच्छुक सार्वजनीक गणेशोत्सव मंडळानी आपल्या भागातील महानगरपालिकेच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र / क्षेत्रीय कार्यालय किंवा महानगरपालिका मुख्य कार्यालय येथे (मो.नं - 8668602083) संपर्क करावा असे आवाहन लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत
आहे.