Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

औशा मध्ये आमदारांचे दुर्लक्ष..! औशांतील मटका,जुगार बंद करण्याची औशेकरांची मागणी

औशा मध्ये आमदारांचे दुर्लक्ष..!
औशांतील मटका,जुगार बंद करण्याची औशेकरांची मागणी
कार्य़कर्ते फक्त कामांसाठी करतात गर्दी
औशेकरांचे प्रश्न कोण सोडवणार..?




औसा (प्रतिनिधी)-औसा शहरामध्ये आमदार अभिमन्यू पवार यांनी करोडो रूपये आपल्या मतदारसंघात विकास कामासाठी आणला.आपल्या निकटवर्ती कार्यकर्त्यांना हा निधी अक्ष्यक्ष: खैरात वाटल्या सारखा वाटण्यात आला त्याचा परिणाम म्हणजे ५%ते१०%ने ती करोंडोची कामे दुसर्यांना देण्यात आल्याची जोरदार चर्चा शहरामध्ये होवू लागली त्यानंतर मात्र कार्यकर्ते शहरातून गायब झाल्याचे चित्र दिसत आहे.त्यामुळे सर्वसामान्य जनतेची कामे करण्यासाठी कोणीही पुढे येत नाही त्यातच आता अवैध मटका जुगार राजरोस पणे चालू असल्याने काही नागरिकांनी उघड पत्रकार परिषद घेवून सांगीतले आहे.

औसा शहरात दोन प्रमुख मटका किंग असून गल्लो गल्ली एजंट मटक्याच्या आकडे राजरोसपणे घेत असतात. औसा शहर आणि तालुक्यात २० पेक्षा अधिक बुकी मटक्यासाठी चालतात. या बुकी आता पहिल्यासारख्या चिट्ट्यावर किंवा कागदावर चालत नाही तर तेही आता डिजिटल होऊन सांकेतिक भाषेत आणि व्हाट्सअपवर मटके चालवतात.अशीही माहिती पत्रकार परिषदेत आयोजकांनी दिली. औसा शहरात सरकारी दवाखान्याच्या दोन्ही बाजूस, मौलाना अबुल कलाम आझाद चौक, औसा पंचायत समिती समोर भारतीय स्टेट बँकेच्या बाजूला, कालन गल्ली समोरील बाजूस, हनुमान मंदिर परिसर, बस स्टॅन्ड जवळ, आझाद चौक निलंगा वेस, किल्ला मैदान, कटघर गल्ली नगरपरिषदची जागा परिसरात अवैध धंदे चालू असल्यास के औसा सारख्या ऐतिहासिक असलेल्या आणि संतांची भूमीस कुठेतरी गालबोट लागत आहे. त्या रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्या बाहेर गावी लोक हे सदरील अवैध धंदे याबाबत चर्चा करीत आहेत व अल्पवयीन नवीन पिढी या कडे आकर्षित होत आहे. यामुळे औसा शहरात सुरू असलेले मटका व जुगाराची दुकाने त्वरित बंद करावे आणि चालविणाऱ्या लोकावर तात्काळ कार्यवाही करावी असे निवेदन औशांतील नागरिक यांनी पोलीस अधीक्षक लातूर यांना दिलेले असल्यांची माहिती शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. औसा शहरांमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात मटका गेल्या अनेक महिन्यापासून चालतोय याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधी मा अभिमन्यू पवार यांचे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याची चर्चा तालुक्यामध्ये जोरदार सुरू आहे. या निवेदनावर अहमद शेख, चौधरी इलियास, सोनाली गुळबिले, नेताजी जाधव, सुवर्णा नाईक आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत..

Previous Post Next Post