पाच खोके ..दोन बोके.. अधिकारी ओके
अतिक्रमण हटवावे या मागणीसाठी पत्रकार रोडवर
उदगीर(संगम पटवारी) येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते महाराष्ट्र उदयगिरी कॉलेज पर्यंत रस्त्यातील अतिक्रमण हटवावे या मागणीसाठी मराठी पञकार संघ व पञकारांनी अधिकाऱ्याच्या निषेधार्थ आज ( ता .27) रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाराष्ट्र राज्याचे माजी गृह राज्यमंत्री तथा उदगीरचे आमदार संजय बनसोडे हे उदगीर दौऱ्यावर आले असता त्यांचा ताफा आठवून अतिक्रमण काढण्या विषयी कैफियत मांडली.आमदार श्री बनसोडे यांनी आंदोलन कर्त्यासी सकारात्मक चर्चा झाली .
उदगीर येथील अतिक्रमण हटवण्याच्या मागणीसाठी जून महिन्याच्या 24 तारखेपासून छत्रपती शिवाजी महाराज चौकात धरणे आंदोलन करत असलेल्या पत्रकारांनी धरणे आंदोलन करत महाराष्ट्राचे राज्यपाल महामही भगतसिंग कोश्यारी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी.उपजिल्हाधिकारी प्रवीण मेंगशेट्टी यांची भेट घेत अतिक्रमण हटवण्यासंदर्भात निवेदन दिले. प्रशासनाकडून अतिक्रमण हटवण्याचा फार्स झाला पण अतिक्रमण जैसेथेच असल्याने पञकारांनी वेगवेगळी आंदोलने करत प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. आज छत्रपती शिवाजी महाराज चौकात अधिकाऱ्यांविरुद्ध निषेधाच्या घोषणा देत आंदोलन केले त्यामुळे आता तरी प्रशासन अतिक्रमण काढेल अशी अपेक्षाही व्यक्त केली.
"माजी गृहराज्यमंत्री आ.संजय बनसोडे यांचा ताफा अडवला,पत्रकाराशी सकारात्मक चर्चा केली."
यावेळी पत्रकार सुनिल हावा पाटील, प्रा बिभीषण मद्देवाड, संगम पटवारी,ॲड.विष्णू लांडगे, भगीरथ सगर, सिद्धार्थ सुर्यवंशी, बबन कांबळे, नागनाथ गुट्टे, सहसचिव सुधाकर नाईक, सदस्य बस्वेश्वर डावळे, निवृत्ती जवळे, आंबादास आल्लमखाने ,अरविंद पत्की, आशोक तोंडारे ,दत्ता गायकवाड आदि उपस्थित होते.