गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
पोलिसांवर हप्तेखोरीचा आरोप ;आत्महत्येपूर्वीचा युवकाचा व्हिडिओ व्हायरल
चौकशीसाठी नेमली समिती
अकोला : उगवा येथील दोन युवकांनी मंगळवारी रात्री गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या प्रकरणाने वेगळे वळण घेतले असुन आत्महत्या केलेल्या आशिष गोपीचंद अडचुले (३५) याचे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले असून, त्यात त्याने अकोट फैल पोलिसांनी केस दाबण्यासाठी हप्ते घेतल्याचा आरोप केल्यामुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली, या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी चौकशी समिती नेमण्यात आली आहे.
उगवा येथील सुभाष शेषराव भातकुले (३६) यांच्यासह आशिष गोपीचंद अडचुले (३५) या दोघांनी नापिकीला कंटाळून मंगळवारी रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली होती. याप्रकरणात अकोट फैल पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. परंतु त्यातील आशिष अडचुले याचे व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले , या व्हिडिओंमुळे पोलीस अडचणीत सापडण्याची शक्यता निर्माण झाल्याचे आता समोर आले आहे. या प्रकरणात अडचुले याच्या कुटुंबीयांनी अद्यापपर्यंत कोणतीही तक्रार केलेली नसल्याचे सांगण्यात येत आहे.