गुन्हेगारीचा पर्दाफाश..
खंडपीठाकडून एका ..भाजप आमदाराच्या बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात; ईडीला नोटीस
प्रतिनिधी/
आतापर्यंत भल्याभल्यांना नोटीस देऊन खळबळ उडवून देणाऱ्या ईडीलाच आता नोटीस मिळाली असल्याचे समोर आले आहे.एका याचिकेवर सुनावणी करतांनाऔरंगाबाद खंडपीठाकडून एका भाजप आमदाराच्या बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात; ईडीला नोटीस बजावण्याचे आदेश दिले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली असुन त्यामुळे लातूर शहरात एकच खळबळ उडाली आहे.
विशेष म्हणजे सुनावणीत २० सप्टेंबर २०२२ पर्यंत या आमदार कुटुंबीयांच्या बेहिशेबी मालमत्तेसंबंधी म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले असल्याचे सांगण्यात येत आहे.यांच्या बेहिशेबी मालमत्तेसंबंधी याचीकाकर्ता यांनी सक्तवसुली संचलनालय दिल्ली व मुंबई येथील कार्यालयात अर्ज सादर केला होता. मात्र कारवाई झाली नाही.
याबाबत हे कुटुंबीय भाजपचे असल्याने त्यांच्याविरुद्ध ईडी कारवाई करत नसल्याचा आरोप अर्जदाराने केला असल्याचे समोर आले आहे.आता 20सप्टेंबर रोजी मालमत्ते संदर्भात कोणती कागदपत्रे दाखल होणार हे आता वेळच ठरवरणार आहे.याकडे आता जनतेचे लक्ष लागले आहे.