Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

“स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” अंतर्गत १५ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर (लकी ड्रॉ) लसीकरणासाठी विशेष बक्षीस योजना

“स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” अंतर्गत 
१५ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर (लकी ड्रॉ) लसीकरणासाठी विशेष बक्षीस योजना 

भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होण्याच्या पार्श्वभूमीवर देशात सर्वत्र “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” साजरा करण्यात येत आहे.“स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” अंतर्गत व लातूर मनपामार्फत कोविड-१९ लसीकरण महोत्सव देखील साजरा करण्यात येत आहे.

तरी शहरातील नागरीकांना कोविड-१९ आजारापासून संरक्षण प्राप्त व्हावे यासाठी व लसीकरणाचे विशेषत: प्रिकॉशन डोसचे प्रमाण वाढावे व नागरिकांना लसीकरण करून घेण्यासाठी प्रोत्साहन मिळावे यासाठी दि.१५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनापासून ते ३० सप्टेंबर २०२२ या कालावधीत लसीकरण करून घेणाऱ्या शहरातील नागरीकांसाठी लातूर मनपामार्फत विशेष बक्षीस योजना जाहीर करण्यात येत आहे. सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी लसीकरण केंद्र बंद राहतील.

याअंतर्गत लकी ड्रॉ पद्धतीद्वारे प्रत्येक आठवड्यास १० विजेते निवडण्यात येणार असून प्रत्येक विजेत्यास रु.१०००/- रोखीने बक्षीस देण्यात येणार आहे. याप्रमाणे दि.१५ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर २०२२ या कालावधीतील ७ आठवड्यात अमृत महोत्सवाच्या निमित्ताने प्रत्येक आठवड्यास १० याप्रमाणे एकूण ७५ विजेत्यांना बक्षीस देण्यात येणार आहे.

सदरील बक्षीस योजना फक्त शहरातील नागरीकांसाठी लागू करण्यात येत आहे. तसेच बक्षीस योजनेसाठी शहरातील कोणत्याही नियमीत लसीकरण केंद्रावर कींवा आपल्या वार्डातील / लसीकरण केंद्र येथे लस घेता येईल. तसेच सदरील बक्षीस योजनेसाठी पहील्या / दुसऱ्या / प्रिकॉशन डोस पैकी कोणताही डोस घेतलेला असेल तो ग्राह्य धरण्यात येईल. लकी ड्रॉ पद्धतीमध्ये नागरीकांना कूपन देण्यात येणार नसून सोडतीमध्ये लसीकरण केंद्र , दिनांक व लस घेतलेल्यांचा सिरीयल क्रमांक निवडण्यात येणार आहे. संबंधीत केंद्रावरील रजिस्टरमध्ये लाभार्थ्यांची नोंद घेतलेली असते. त्या रजिस्टर मधील सिरीयल क्रमांकानूसार विजेत्याची निवड करण्यात येईल. सोडतीमध्ये शहराबाहेरील नागरीकाचा सिरीयल क्रमांक आल्यास त्याच्या पुढील क्रमांकाचा शहरातील नागरीक विजेता म्हणून घोषित करण्यात येईल. 

बक्षीस योजनेअंतर्गत प्रत्येक आठवड्यातील सोमवार ते शनिवार पर्यंत शहरातील सर्व लसीकरण केंद्रावर जेवढे लाभार्थी होतील त्या लाभार्थ्यामधून प्रत्येक आठवड्यास १० विजेते निवडले जातील. लकी ड्रॉ ची सोडत प्रत्येक सोमवारी मनपा मुख्य कार्यालयातील मा.उपायुक्त यांचे दालनात सकाळी ११.०० वा. काढण्यात येईल व १० विजेत्यांना दूरध्वनीवर माहिती देवून त्या पुढील रोजी अर्थात मंगळवारी सकाळी ११.०० वा. बक्षीस रक्कम वाटप करण्यात येईल.

तरी शहरातील नागरीकांनी या बक्षीस योजनेचा लाभ घ्यावा व आपले प्रलंबित असलेले लसीकरण पूर्ण करून घ्यावे असे आवाहन लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.   

     
                                              



                                                                          उपायुक्त

                                          लातूर शहर महानगरपालिका, लातूर

Previous Post Next Post