राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना अतिक्रमण काढण्याचे दिले निवेदन
उदगीर (संगम पटवारी)
येथील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणे काढल्याशिवाय नालीचे व रस्त्याचे काम करू नये या मागणीचे निवेदन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना देण्यात आले .
छञपती शिवाजी महाराज चौक ते महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय पर्यंतच्या रस्त्यावरील शंभर फुटाच्या आतील आतिक्रमणे काढल्या शिवाय रस्ता व नालिचे काम करु नये या मागणीसाठी पत्रकाराच्या वतीने मागील ३५ दिवसापासून छत्रपती शिवाजी महाराज चौकात धरणे आंदोलन चालू आहे. दरम्यान पत्रकारांनी वेगवेगळ्या प्रकारची आंदोलने करत विभागीय आयुक्त औरंगाबाद ,जिल्हाधिकारी लातूर ,बांधकाम विभागाचे विभागीय मुख्य अभियंता नांदेड यांची भेट घेत पत्रकारांनी निवेदन देण्यात आले . बांधकाम विभागाकडून मोठा फौजफाटा आणत आतिक्रमण हाटवण्याचा फार्स केला . त्यामुळे पत्रकारांनी महामहिम राज्यपाल भगसिंह कोश्यारी यांची भेट घेत अतिक्रमणा संदर्भात गर्हाणे कानावर घालुन आंदोलना संदर्भातली कैफियत राज्यपाल यांच्यापुढे मांडुन मराठी पत्रकार संघाच्या वतीने अतिक्रमण काढूनच रस्ता करावा अशा आशयाचे निवेदनही देण्यात आले.
यावेळी राज्यपाल कोश्यारी यांनी जिल्हाधिकारी यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांना सुचना देऊन कार्यवाही करण्यास सांगितले. यावेळी पत्रकार सुनिल हावा पाटील, मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रा.बिभीषण मद्देवाड, सचिव सिद्धार्थ सुर्यवंशी, कोषाध्यक्ष बबन कांबळे, सदस्य नागनाथ गुट्टे, सहसचिव सुधाकर नाईक, सदस्य बस्वेश्वर डावळे, निवृत्ती जवळे,अरविंद पत्की,संगम पटवारी, बाबासाहेब मादळे उपस्थित होते.