दहिहंडीला खेळ म्हणून शासकीय मान्यता देणाऱ्या मुख्यमंत्र्यांना बेड्या ठोका..!
मुंबई-श्री कृष्ण पुराणात उल्लेख असलेल्या दहिहंडी या सणाला शासकीय खेळ म्हणून मान्यता देणे हे बेकायदेशीर असून या प्रकरणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी विनंती महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक साहेब महाराष्ट्राचे मुख्य धर्मादाय आयुक्त यांचेकडे पत्रान्वये मागणी करण्यात आली आहे . दहिहंडी हा केवळ हिंदु आणी हिंदूंचाच सण असून या सणात इतर धर्मीयांना घुसवण्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याचा प्रयत्न हाणून पाडणे गरजेचे आहे. हिंदु धर्म ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याची जायदाद नसून हा प्रकार निंदनिय असल्याचे पत्रात नमुद करण्यात आले आहे . तातडीने हा वादग्रस्त जि.आर रद्द न केल्यास पुढील सर्व परिणामांची जबाबदारी महाराष्ट्र शासनाची राहील.अशा असयाचे पत्र महाराष्ट्राचे मुख्य धर्मादाय आयुक्त यांच्याकडे प्रशांत पद्माकर आष्टीकर यांनी दिले तसेच मा. उध्दव ठाकरे साहेब मुंबई
मा. गृहमंत्री महाराष्ट्र राज्य, पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांनाही माहितिस्तव देण्यात आल्याचे प्रेस नोट द्वारे कळविण्यात आले आहे.