गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
जावयाने सासूचा खून करून, केली स्वत: आत्महत्या
७ वर्षांच्या मुलावरही केले वार
लातूर : बायकोला नांदायला पाठवीत नसल्याचा राग मनात धरून जावयाने सासूच्या डोक्यात कोयत्याने अनेक वार करून अत्यंत निर्दयीपणे तिचा खून केल्याची धक्कादायक प्रकार लातूर हनमंतवाडी ये घटना शहरातील हणमंतवाडी परिसरात मंगळवार (दि. २३) रात्री ७ वाजेच्या सुमारास घडली असुन . जावयाने सासूवर केलेले वार ईतके भयंकर होते, की सासूच्या डोक्यात आरपार कोयता अडकून बसला होता. खून केल्यानंतर जावयाने स्वतःला जाळून घेतले असून, त्याने पोटच्या ७ वर्षांच्या मुलावरही कोयत्यान वार केले. यात मुलगा गंभीर जखमी झाला आहे.त्यास जवळच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
याबाबत मिळाले़ल्या माहिती नुसार उदगीर येथील रहिवासी असलेल्या रजनीकांत वेदपाठक याचा लातूर येथील हणमंतवाडी येथे वास्तव्यास असलेल्या चंद्रसेना वेदपाठक (वय ५५) यांच्या मुलीशी विवाह झालेला होता. त्यांना कार्तिक रजनीकांत वेदपाठक (७) हा मुलगा आहे. मात्र मागील काही महिन्यांपासून पत्नी नांदायला न येता माहेरीच राहात होती. अनेक वेळा विनंती करूनही सासू बायकोला नांदायला पाठवीत नसल्यामुळे रजनीकांतच्या डोक्यात सासूबद्दल प्रचंड तिरस्कार बसलेला होता. दरम्यान, मंगळवारी (दि.२३) तो बायको आणि मुलांना घेऊन जाण्यासाठी हणमंतवाडी परिसरातील आपल्या सासूरवाडीत आला होता. यावेळी त्याचा सासूसोबत वाद झाला आणि संतापलेल्या जावयाने घरातीलच तीक्ष्ण विळ्याने एकापाठोपाठ एक असे अनेक वार सासू चंद्रसेना यांच्या डोक्यात केले. हे वार इतके गंभीर होते, की सासूच्या डोक्यात आरपार गेलेला विळा डोक्यातच अडकून बसला होता. यावेळी शेजारीच असलेला स्वतःचा ७ वर्षांचा मुलगा कार्तिक याच्या मानेवरही अत्यंत निर्घृणपणे वार केल्यामुळे त्याचीही प्रकृती गंभीर असून, त्याच्यावर लातूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. दरम्यान, मुलाला आणि सासूला मारल्यानंतर रजनीकांत वेदपाठक याने स्वतःला पेटवून घेतल्यामुळे त्याला गंभीर जळालेल्या अवस्थेत शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, डॉक्टरांनी त्याला तपासून मयत घोषित केले. यासंदर्भात प्रक्रिया गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरा पर्यंत चालू असल्याची माहिती पोनि माकोडे यांनी दिली.