Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

'दहीहंडी'ला खेळाची मान्यता देणार्यांनी 'मोहर्रम'ला पण द्यावी ...सरकार म्हणजे नुसती येङयाची जत्रा..! औशाची जागा, पुन्हा आमच्याकडे वळवू-सुषमा अंधारे

'दहीहंडी'ला खेळाची मान्यता देणार्यांनी 'मोहर्रम'ला पण द्यावी-सुषमा अंधारे
सरकार म्हणजे नुसती येङयाची जत्रा..!
औशाची जागा, पुन्हा आमच्याकडे वळवू



लातूर- : सरकारमध्ये येड्यांची जत्रा अन् कारभारी सतरा झाले असल्याचे घनाघाती टिका शिंदे सरकार वर शिवसेनेच्या उपनेत्या सुषमाताई अंधारे यांनी शिवसेनेच्या वतीने मंगळवारी दि.३०ऑगस्ट रोजी दुपारी येथील शासकीय विश्रामगृहावर पदाधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीस मार्गदर्शन करण्यासाठी आल्यानंतर पत्रकार परिषदे मध्ये केली.
यावेळी पत्रकारांनी 'दहिहंडी' ला खेळाची मान्यता मिळाली या विरूद्ध मुख्य धर्मदाय आयुक्त यांच्याडे श्री प्रशांत आष्टीकर यांनी जी आर रद्दकरण्याची मागणी केली आहे यावर आपले काय म्हणने आहे असे विचारले असता 'दहीहंडी'ला खेळाची माण्यता देणार्यांनी 'मोहर्रम'ला पण द्यावी सरकार म्हणजे नुसती येड्यांची जत्रा अन् कारभारी सतरा असल्याची घनाघाती टिका शिंदे सरकार वर शिवसेनेच्या उपनेत्या सुषमाताई अंधारे यांनी केली.
प्रश्नांचा जाब विचारण्यासाठी गणेशोत्सवानंतर शिवसेना महाप्रबोधन यात्रा काढणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
"औस्याची शिवसेनेची हक्का ची जागा आम्ही भाजपच्या घशात घातली, पण येणार्या निवडणुकिमध्ये असे होणार नाही,आम्ही पुर्ण ताकतीनिशी ती जगा परत आमच्याकडे आनणार.
गणेशोत्स संपल्यानंतर शिवसेनेच्या सर्व जिल्हा प्रमुखांचा मेळावा मुंबईत घेतला जाणार असून, त्यानंतर राज्यात प्रत्येक लोकसभा मतदारसंघात शिवसेनेची महाप्रबोधन यात्रा काढून जनतेशी संवाद साधला जाणार आहे. भविष्यात 'मविआ' सोबत शिवसेना सर्व निवडणुका लढणार आहे. तसेच लातूर जिल्ह्यातील निलंगा व औसा हे दोन विधानसभा मतदारसंघ ताकदीने शिवसेना लढणार असल्याचे सुषमाताई अंधारे असल्याचे सांगीतले".
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह आदित्य ठाकरे महाराष्ट्रात जनतेशी संवाद साधत असून, प्रचंड गर्दी होत आहे. ही गर्दी म्हणजे भाजपाविरोधात संतापाची लाट आहे. ईडी, सीबीआय, निवडणूक आयोग या सरकारी यंत्रणांच्या माध्यमातून वेठीस धरत भाजपाने ऑपरेशन लोटस नव्हे, तर सत्तेचा व पैशाचा गैरवापर चालविला आहे. ज्यांना रुमणे, कुळव माहीत नाही, त्यांना कृषीमंत्री बनविले. हत्तीरोग डासामुळे होतो की पाण्यामुळे हे कळत नाही अशा व्यक्तीला आरोग्यमंत्री केलेय. शेतकरी आत्महत्या करीत आहेत. महिला असुरक्षित आहेत. सरकारमध्ये महिला मंत्री नाही. त्यामुळे प्रश्न मांडायचे कसे आणि कुणाकडे? हा प्रश्न जनतेला पडला आहे.

यावेळी जिल्हाप्रमुख शिवाजी माने व बालाजी रेड्डी, लातूर,महानगरप्रमुख विष्णुपंत साठे, महिला आघाडीच्या जिल्हा संघटक सुनिताताई चाळक, बाबुराव शेळके, किसन समुद्रे, साबदे आदींची उपस्थिती होती.

Previous Post Next Post