आता आमदार निधी पाच कोटी
कोणती कामे आमदार निधी अंतर्गत येतात?
राज्यातील सर्व आमदारांना त्यांच्या आपापल्या मतदारसंघातील विकास कामांसाठी मिळणारा आमदार निधी पाच कोटी रुपये करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी केली होती.याला साहजिकच सर्वपक्षीय आमदारांनी या घोषणेचे स्वागत केले. लागोपाठ तिसऱ्या वर्षी आमदार निधीत एक कोटीची वाढ करण्यात आली. या घोषणेमुळे सरकारच्या तिजोरीवर अतिरिक्त ३५४ कोटींचा बोजा पडणार आहे.
आमदार निधी कशासाठी वापरतात?
आमदारांच्या मतदारसंघातील छोटी-मोठी कामे करता यावीत म्हणून प्रत्येक आमदाराला निधी उपलब्ध केला जातो. यात पायवाटा, रस्ते, छोट्या गल्ल्या, व्यायामशाळा, व्यायामशाळेची उपकरणे, जलवाहिन्या, शाळा, मंडयांची दुरुस्ती अशी छोटी-मोठी कामे करता येतात. आमदारांनी सुचविलेल्या कामांना जिल्हा नियोजन विभागाकडून मंजूरी दिली जाते आणि कामे प्रत्यक्ष अंमलात आणली जातात. छोटी-छोटी कामे करून मतदारांना खुश करण्याकरिता आमदार निधीचा आमदारांना उपयोग होतो.परंतू काही कार्यकर्ते मात्र आमदारांकडून पत्र घेतात आणि त्याचा दुरुपयोग करून 5%ते10% ला ती कामे विकुन बाजारीकरण करतात.आणि त्यामुळे कामे रखडली जातात. आमदार निधीतून जे कामे पुर्ण होतात, त्या-त्या भागांमध्ये आमदारांकडून फलक लावून जाहिरातबाजी केली जाते. पुढील निवडणुकीत मतांसाठी या निधीचा चांगला उपयोग होतो. निवडून आल्यास आमदार निधीतून ही कामे करीन, असे आश्वासन प्रचाराच्या काळात दिली जातात. काही आमदार तर गल्लोगल्ली आपल्या आमदार निधीतून केलेल्या कामांची जाहिरात करीत असतात.
राज्यात कामे मंजूर करण्याची प्रक्रिया काय आहे ?
आमदारांनी कामे सुचविल्यावर नियोजन विभागाकडून ती मंजूर केली जातात. कामे कोणाला द्यायची हे आमदारच ठरवितात.त्यामुळे यातूनच आमदार निधीत गैरव्यवहार होतात, अशा तक्रारी असतात. कारण कामांचे वाटप आमदार निकटवर्तीयांना करतात, अशी सार्वत्रिक तक्रार असते.