स्वातंत्र्य दिनाच्या सुवर्ण महोत्सवी खासदार- सुधाकर शृंगारे
यांनी काढली मोटारसायकल रॅली
15 ऑगस्ट...स्वातंत्र्य दिनाच्या सुवर्ण महोत्सवाचे औचित्य साधून आज खासदार- सुधाकर शृंगारे यांनी कार्यकर्त्यांसह लातुर शहरातल्या मुख्य रस्त्यांवरून हातात तिरंगा घेऊन मोटारसायकल रॅली काढली. या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने युवक सहभागी झाले होते. "सुप्रिया निवास" या खासदार सुधाकर शृंगारे यांच्या निवासस्थाना पासून पिव्हीआर चौक, पाण्याची टाकी,छत्रपती शिवाजी महाराज चौक, महात्मा गांधी चौक, गंज गोलाई, राजर्षी शाहू महाराज चौक, विवेकानंद चौक या मार्गाने ही मोटारसायकल रॅली काढण्यात आली.