साहेब...'घरी कार्यक्रम आहे, तर..यांना घरीच पाठवा..!
मुंबई : महाराष्ट्रातील जनतेच्या कामाचा मागील काहि महिन्यांपासुन या राजकारणाच्या घडमोडी मुळे पुर्णत: खेळखंडोबा झाला असुन त्यात हे असे मंत्री मला घरी एक कार्यक्रम आहे, त्यासाठी मला गेलेच पाहिजे, माझे प्रश्न लवकर घ्या, अशी विनंती शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी विधान परिषदेत केल्याने सगळेच अवाक झाले. विधिमंडळाचे कामकाज महत्त्वाचे की घरचा कार्यक्रम, अशी चर्चा संपुर्ण महाराष्ट्रात सुरू झाली.
शिंदे-भाजप युती सरकारच्या पहिल्याच विधिमंडळ अधिवेशनात मंत्री सभागृहात नसल्यामुळे अनेकवेळा
विरोधकांनी सरकारला धारेवर धरले. मंत्रिमंडळात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह २० कॅबिनेट मंत्री असून, एकही राज्यमंत्री नाही. त्यामुळे विधानसभा, विधान परिषदेतील कामकाजाला सामोरे जाताना मंत्र्यांची दमछाक होताना दिसून आली. बुधवारी तर मुख्यमंत्र्यांनी बैठकांमुळे आपल्याकडील सर्व खात्यांची उत्तरे देण्याचा अधिकार मंत्री शंभूराज देसाई यांना दिले होते.
गुरुवारी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात शिक्षण विभागाचे प्रश्न होते. पहिल्याच प्रश्नाला उत्तर देताना केसरकर म्हणाले की, मला घरी एक कार्यक्रम आहे, माझे प्रश्न लवकर घ्या, माझे आणखी पाच प्रश्न आहेत मला घरी छोटासा कार्यक्रम आहे, मला त्यासाठी गेले पाहिजे, असे बेजबाबदार वक्तव्य करुन महाराष्ट्राती जनतेचा अपमान केला असल्याची सर्वत्र चर्चा होत आहे. केसरकर एवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांच्या खात्याशी संबंधित नियम ९३ अंतर्गत एक सूचनाही लवकर घेण्याची सूचना सभापतींना केली. त्यामुळे साहेब...'घरी कार्यक्रम आहे, तर..यांना घरीच पाठवा अशी सर्वसामान्य जनतेची भावना होत आहे.