Ads by Eonads
दलीत बालकाची जातीय द्वेषातुन हत्त्या केल्याच्या निषेधार्थ लातूर येथे भिम आर्मी चे आंदोलन
राजस्थान मधील जल्लोर जिल्ह्यातील सुराणा गावातील
घटना
लातूर प्रतिनिधी
दिनांक २२जुलै २०२२रोजी लातुरात
राजस्थान मधील जल्लोर जिल्ह्यातील सुराणा गावातील दलीत बालकाची जातीय द्वेषातुन हत्त्या केलेल्या हत्येच्या निषेधार्थ गांधी चौक येथे भिम आर्मी च्या वतीने प्रतिकात्मक मटका फोडून राजस्थान कॉंग्रेस सरकारच्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात आले 1) भारतीय संविधानातील अनुच्छेद 17 नुसार कुठल्याही प्रकारची अस्पृश्यता पाळण्यावर बंदी आहे. असे असताना देखील भारतीय गणराज्यातील घटक राज्य राजस्थान मधील जालोर जिल्ह्या, सुराणा गाव, येथील सरस्वती विद्या मंदिर स्कूल मधील इयत्ता तिसरीतील 9 वर्षीय विद्यार्थी "इंद्रकुमार मेघवाल" याची पिण्याच्या पाण्याच्या माठाला हात लावला म्हणून "छैल सिंह" या शिक्षकाने 'एका अनुसूचित जाती मधील विद्यार्थ्याने पिण्याच्या पाण्याला हात लावला म्हणून, जातिवाचक शिवीगाळ करून, क्रूर आणि अमानुष पद्धतीने 20 जुलै 2022 रोजी मारहाण केली, सदर विद्यार्थी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आला, परंतु मृत्यू सोबत चाललेली त्याची झुंज अखेर संपली, अहमदाबाद मधील सिविल हॉस्पिटल मध्ये 13 ऑगस्ट रोजी इंद्रकुमार मेघवाल चा मृत्यू झाला, हा मृत्यू नसून हत्या आहे.
2) National Crimes Records Bureau रिपोर्ट 2021 नुसार, 2016-20 या चार वर्षात राजस्थान मधील अनुसूचित जाती व जनजाति वरील अन्याय /अत्याचार/ बलात्कार/ खून यासारख्या गुन्ह्यामध्ये 6,000 वरून 9,000 पर्यंत वाढ झाली आहे. परंतु आरोपींना शिक्षा होण्याचा अवघा 7% दर आहे.
3) अशी भयानक परिस्थिती राजस्थान या राज्यांमध्ये अनुसूचित जाती व जनजाति समोर निर्माण झाली आहे. त्यामुळे जातीवादी शक्ती, संविधान विरोधी शक्ती, मानवता विरोधी शक्ती मोकाट फिरत असून त्यांच्यावर कायदा आणि सुव्यवस्थेचा कुठलाही धाक राहिलेला नाही.
4) अशोक गेहलोत यांच्या नेतृत्वाखालील राजस्थानमधील सरकार अकार्यक्षम असून, संपूर्ण राजस्थान मध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला असून देखील, न्यायाच्या नावाखाली पीडित बालकाच्या परिवाराला अवघे 5 लाख रुपये देऊन थट्टा करण्यात आली आहे.
5) त्यामुळे पीडिताच्या परिवाराला नुकसान भरपाई म्हणून 2 करोड रुपये आणि परिवारा मधील एका सदस्याला सरकारी नोकरी तात्काळ देण्यात यावी.
6) गुन्हेगार छैल सिंहला फास्ट ट्रॅक कोर्ट द्वारा दोषी ठरवून फाशीची सजा सुनावण्यात यावी.
7) अनुसूचित जाती आणि जनजाति विरोधी राजस्थान मधील अशोक गेहलोत सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करावी.
8) वरील मागण्याचा सहानुभूतीपूर्वक आणि न्यायिक दृष्टिकोनातून विचार करून इंद्रकुमार मेघवाल याला न्यायच द्यावा असा इशारा या आंदोलनातून देण्यात आला यावेळी भिम आर्मी चे महाराष्ट्र प्रदेश संघटक अक्षय धावारे मराठवाडा अध्यक्ष विनोद कोल्हे जिल्हा अध्यक्ष विलास चक्रे जिल्हा सचिव बबलू शिंदे जिल्हा संघटक बबलू गवळे औसा तालुका अध्यक्ष समाधान कांबळे अहमदपूर तालूका अध्यक्ष अफसर शेख लातूर तालूका अध्यक्ष सुनिल गायकवाड समाधान झोडपे शुभम ससाने रितेश भुतकर रोहन धावारे कुणाल शेवाळे निलेश कांबळे बंटी गायकवाड आकाश इंगळे नागनाथ सातपुते आबा मस्के अन्य कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते