येरोळ मोड़ येथे शेतकर्यांचा चार तास रास्ता रोको
गोगलगाई मुळे नुकसान झालेल्या शेतकर्यांना ५०हजार नुकसान भरपाई द्यावी
लातूर/येरोळ
ओमप्रकाश तांबोळकर
येरोळ : लातुर जिल्ह्यासह शिरूरअनंतपाळ तालुक्यातील सोयाबीन,तुर, मुग,उडीद व ज्वारीच्या पिकाचे सततचा पाऊस व गोगलगाईमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून पिकांचे सरसकट पंचनामे करून अन्यथा शेतकर्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपयापेक्षा जास्त अनुदान द्या म्हणुन येरोळमोड येथे सतिस सिंदाळकर यांच्या नेतृत्वाखाली चार तास रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.
यावेळी लातुर नळेगाव उदगीर हायवे रोडवर रस्तारोकोमुळे वहातुकीची मोठी कोंडी झाली होती. माञ प्रवाशांना आंदोलन करणार्या कार्यकर्त्यानी चहा पाणी नाष्ट्याची सोय केली होती. या आंदोलनामध्ये माजीकृषी सभापती गोविंद चिलकुरे, भाजपाचे तालुकाअध्यक्ष मगेंश पाटील, ज्ञानोबा बालवाड, प्रभाकर बरदाळे, प्रभाकर पालकर , शाम सिंदाळकर यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत शिरूरअनंतपाळ तालुक्यातील येरोळसह डिगोळ, चामरगा, पांढरवाडी, सुमठाणा , नागेवाडी, दैठणा, साकोळ, उजेड, राणी अंकुलगा, तळेगाव, जांभळवाडी, हानंतवाडी, बोळेगाव, कारेवाडी, धामणगाव, आजणी, होनमाळ या गावासह तीस गावातील शेतकर्यांनी येरोळमोड ता.शिरूरअनंतपाळ या फाट्यावर चार तास रस्ता रोको आंदोलन केले.
यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी आपल्या कुटुंबीयांसह रस्ता रोको मध्ये सहभागी झाले होते.
यावेळी जर्नाधन पाटील सुमठाणकर, प्रमोद पाटील, गुंडेराव चोसष्टे, बब्बण साकोळकर ,संदिप पाटील, भागवत तोंडारे, रमेश गुणगुणे, मचिंद्र भालेकर यांच्यासह हजारो शेतकरी उपस्थित होते. आंदोलकाचे निवेदन नायब तहसिलदार आर.एन, पञीके यांनी स्विकारले. पोलीस निरिक्षक रामेश्वर तट, पोलीस निरिक्षक जे.बी.मानुल्ला, शिवकुमार बिराजदार , लक्ष्मण पाटील, वासुदेव यांच्यासह पोलीस कर्मचार्यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.
सततच्या पावसाने व गोगल गाईला उपद्रवामुळे शिरूर अनंतपाळ तालुक्यातील चालु खरीप हंगामातील सर्व पिकांचे नुकसान झाले.
या वर्षीच्या खरीपाच्या पेरण्या झाल्यापासुन शेतकरी संकटात सापडलेला आहे. सुरूवातीला मोठा पाऊस झाला त्यामुळे सोयाबीन उगवले नाही. नंतर शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केली त्यावर गोगल गाईने हल्ला केला. गोगल गाईच्या उपद्रवाने काही शेतकऱ्यांना तिबार पेरणी करावी लागली. तिबार पेरणी करूनही संकट संपले नाही सततच्या पावसाने खरीपाच्याही पिकांची वाढच झाली नाही. काही पिके तर पाण्याने कुजुन गेली. या सर्व संकटामुळे शेतकरी हतबल झाला आहे. आज शेतकरी आर्थिक आडचणीत सापडला आहे. त्याला शासनाने मदत केली पाहीजे.
शेतकर्यांच्या मागण्या-
• सततचा पाऊस व गोगलगाईच्या हल्ला या मुळे मुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर आर्थिक मदत म्हाणुन ५०,०००/- जमा करण्यात यावे.
• शिरूर अनंतपाळ तालुक्यासह लातुर जिल्हयाचा अतिवृष्टीच्या यादीत समावेश करण्यात यावा.
• सततच्या पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यात यावी.
वरील सर्व बाबीचा शासनाने दखल घेवुन शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करण्यात यावी
याबाबत तहसीलदार यांना शेतकर्यांच्यावतीने निवेदन देण्यात आले.
समस्त शेतकरी बांधव ता. शिरूर अनंतपाळ च्या वतीने सतिष शिवराज सिंदाळकर उपसरपंच येरोळ यांनी माहिती दिली .
या आंदलनासाठी डिगोळ,येरोळ,सुमठाणा,शिरूर अनंतपाळ,दैठण,राणी अंकुलगा,उजेड,साकोळ,जांभळवाडी,नागेवाडी,चामरगा,बेळगाव परिसरातील हजारोंच्या शेतकर्यांनी सहभाग घेतला होता
हजारोंच्या शेतकर्यांनी सहभाग घेतला