आतिक्रमण हाटवण्यासाठी आंदोलनास कलावंतानी दिला पाठींबा
कार्यक्रमातून आतिक्रमण विरोधी जनजागृती
उदगीर (संगम पटवारी) येथील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणे काढल्याशिवाय नालीचे व रस्त्याचे काम करु नये या मागणीसाठी चालू असलेल्या धरणे आंदोलनात शाहिरी कार्यक्रमातून आतिक्रमण विरोधी जनजागृती करत प्रशासनाचे लक्ष वेधले.
छञपती शिवाजी महाराज चौक ते महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय पर्यंतच्या रस्त्यावरील शंभर फुटाच्या आतील आतिक्रमणे काढल्या शिवाय रस्ता व नालिचे काम करु नये या मागणीसाठी पत्रकाराच्या वतीने मागील ४0 दिवसापासून धरणे आंदोलन चालू आहे. दरम्यान पत्रकारांनी वेगवेगळ्या प्रकारची आंदोलने करत , विभागीय आयुक्त औरंगाबाद ,जिल्हाधिकारी लातूर ,बांधकाम विभागाचे विभागीय मुख्य अभियंता नांदेड यांची भेट घेत निवेदन दिले . बांधकाम विभागाकडून मोठा फौजफाटा आणत आतिक्रमण हाटवण्याचा फार्स केला . त्यामुळे पत्रकारांनी महामहिम राज्यपाल भगसिंह कोश्यारी यांची भेट घेत अतिक्रमणा संदर्भात गर्हाणे कानावर घालुन आंदोलना संदर्भातली कैफियत त्यांच्यापुढे मांडली होती .
मागील ४० दिवसात पञकारांच्या आंदोलना दरम्यान उदगीरातील विविध सामाजिक.संघटना ,राजकिय पक्षांचे पदाधिकारी यांनी आंदोलनास पाठींबा दर्शवला आहे. शासनाचे लक्ष वेधण्यासाठी व आतिक्रमण विरोधी जनजागृती करण्यासाठी व आतिक्रमण हाटाव मोहिम तिव्र करण्यासाठी शाहिरी कार्यक्रमातून जनजागृती केली . यावेळी कलाकारांनी वेगवेगळ्या गीतातून आतिक्रमण हटवण्याची मागणी केली . यावेळी शाहिर विशाल तोरकडे ,घोडके विशाल ,सचिन काळे ,मनोज रेणके ,योगेश घोगरे , आदी कलाकारांनी शाहिरीतून प्रबोधन केले ,यावेळी पञकार आंदोलन करत असुन प्रशासनानी लवकर आतिक्रमण हटवण्याची मागणी कलाकारांनी केली . यावेळी पत्रकार सुनिल हावा पाटील, प्रा.बिभीषण मद्देवाड, सिद्धार्थ सुर्यवंशी, बबन कांबळे, नागनाथ गुट्टे, सुधाकर नाईक, बस्वेश्वर डावळे, निवृत्ती जवळे, आंबादास आल्लमखाने ,अरविंद पत्की,संगम पटवारी, आशोक तोंडारे ,बाबासाहेब मादळे आदी उपस्थित होते.