Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

Dysp सुधीर खिरडकर यांच्याकडे..अहमदपूर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाचा तात्पुरता पदभार

Ads by Eonads
       Dysp सुधीर खिरडकर यांच्याकडे..अहमदपूर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाचा तात्पुरता पदभार



             यंदा गणेशोत्सव 2022 मोठ्या प्रमाणात व उत्साहात साजरा करण्यात येत असून गेल्या महिन्यामध्ये उपविभाग अहमदपूर चे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.बलराज लंजिले हे सेवानिवृत्त झाल्यानंतर अहमदपूर उपविभागाचा चार्ज चाकूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी तथा सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री.निकेतन कदम
प्रशिक्षणार्थी पोलिस उप अधीक्षक डॉ समाधान पाटील

Ads by Eonads
प्रशिक्षणार्थी पोलिस उप अधीक्षक मनिषा कदम



यांच्याकडे देण्यात आला असून श्री.निकेतन कदम यांच्याकडे अहमदपूर व चाकूर चा दोन्ही चार्ज आहे.
  ‌ सध्या गणेशोत्सव चे अनुषंगाने अहमदपूर पोलीस उपविभाग मोठ्ठा असल्याने व उपविभागातील पोलीस स्टेशन व पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गावांची संख्या जास्त असल्याकारणाने कायदा व सुव्यवस्थाच्या अनुषंगाने उपविभाग अहमदपूरचा तात्पुरता बंदोबस्त पाहणी व सुपर्व्हिजन पोलीस उपाधीक्षक श्रीसुधीर खिरडकर, पोलीस प्रशिक्षण केंद्र,बाभळगाव यांच्याकडे देण्यात आला आहे. तसे आदेश आज रोजी पोलीस अधीक्षक श्री. निखिल पिंगळे यांनी काढले आहेत.
            तसेच महाराष्ट्र पोलीस अकादमी नाशिक येथून 2 प्रशिक्षणार्थी पोलीस उपाधीक्षक डॉ.समाधान पाटील व मनीषा कदम यांना लातूर गणेश उत्सव बंदोबस्त कामी पोलीस अकादमी नाशिक येथून पाठविण्यात आलेले आहे.
                उपविभाग अहमदपूर येथे तात्पुरत्या स्वरूपात गणेश उत्सवाच्या बंदोबस्त पाहणी व सुपव्हिजन साठी पूर्ण वेळ पोलीस उपाधीक्षक दर्जाचे अधिकारी तसेच इतर बंदोबस्त कामी दोन प्रशिक्षणार्थी पोलीस उपाधीक्षक लातूर पोलिसांच्या सोबतीला मिळाल्याने गणेश उत्सव संदर्भाने येणाऱ्या अडचणी व बंदोबस्त प्रभारी अधिकारी मिळाल्याने उपविभागामधील गणेशोत्सवा अनुषंगाने पोलीस बंदोबस्त चे योग्य नियोजन करून गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पडण्यास मदत होणार आहे .
Previous Post Next Post