Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

दिवंगत अभिनेते आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री NTR यांच्या मुलीची आत्महत्या

दिवंगत अभिनेते आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री NTR यांच्या मुलीची आत्महत्या


 दिवंगत अभिनेते, TDP पक्षाचे संस्थापक आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एनटी रामाराव (NTR) यांची मुलगी उमा माहेश्वरी यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सोमवारी उमा हैदराबाद येथील राहत्या घरी लटकलेल्या अवस्थेत आढळल्या. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी स्थानिक शासकीय रुग्णालयात पाठवला . पोलिसांनी याप्रकरणी गुन्ह्याची नोंद केली असून, पुढील तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उमा माहेश्वरी यांना आरोग्याच्या काही समस्या होत्या. गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. माहेश्वरी यांनी हैदराबादच्या जुबली हिल्स येथील त्यांच्या राहत्या घरी गळफास घेतला. प्रकृती अस्वास्थ्यामुळे उमा डिप्रेशनमध्ये होत्या आणि त्यामुळेच त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असल्याची माहिती समोर आली आहे.
Previous Post Next Post