11सराईत गुन्हेगारांवर लावला मोक्का (MCOCA)
तब्बल 12 वर्षानंतर लातूर जिल्ह्यातील कारवाई
सराईत गुन्हेगारांच्या टोळीच्या विरोधातील मोक्का (MCOCA) गुन्ह्याला अपर पोलीस महासंचालकांची मंजुरी.तपासी अधिकारी सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री.निकेतन कदम व मोक्का तपास पथकाला मोठे यश...
मार्च 2022 रोजी पोलीस ठाणे चाकूर येथे चापोली शिवारातील दाखल असलेल्या खून व खुनाचा कट करणाऱ्या तसेच अनेक गंभीर गुन्हे दाखल असलेल्या आंतरजिल्हा टोळीविरुद्ध मोका (MCOCA) कायद्याप्रमाणे दोषारोपपत्र पाठवण्यास अपर पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य कायदा व सुव्यवस्था यांचेकडून अंतिम मंजुरी मिळाली असून पोलीस अधीक्षक श्री. निखिल पिंगळे,अपर पोलीस अधीक्षक श्री.अनुराग जैन यांचे सखोल मार्गदर्शनात तपासी अधिकारी,चाकूर उपविभागीय पोलीस अधिकारी तथा सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री. निकेतन कदम व त्यांच्या टीमच्या सखोल व कसोशीने केलेल्या तपासाला यश आले आहे.
संघटित गंभीर गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांच्या विरुद्ध मोक्का अंतर्गत कारवाई ही लातूर जिल्ह्यातील जवळपास बारा वर्षानंतर ची पहिलीच कारवाई आहे.
चाकूर पोलीस ठाणे हद्दीतील चापोली शिवारात 20 मार्च 2022 रोजी खुनाचा गुन्हा, गुन्हा रजिस्टर क्रमांक 97/ 2022 कलम 302, 120 (ब), 201, 212, 216, 34 भादवी प्रमाणे दाखल झाला.
पोलीस अधीक्षक श्री.निखिल पिंगळे,अपर पोलीस अधीक्षक श्री. अनुराग जैन,उपविभागीय पोलीस अधिकारी,चाकूर श्री.निकेतन कदम यांचे आदेश व मार्गदर्शनाप्रमाणे चाकूर पोलीस ठाण्याचे पो.नि. बालाजी मोहिते व पोलीस अंमलदार यांनी तपास करून गुन्ह्यातील मुख्य आरोपी व सूत्रधार असलेला नारायण तुकाराम इरबतनवाड, वय 45 वर्ष ,राहणार शिरूर ताजबंद, तालुका अहमदपूर जिल्हा लातूर यांच्यासह इतर 11 ज्यामध्ये 10 आरोपी आणि 1 विधी संघर्ष बालक निष्पन्न केले. सर्व आरोपींनी सदरचा गुन्हा केल्याचे कबूल केले. आरोपींना मा.कोर्ट मंजुरीने अटक करून त्यांच्याकडून गुन्ह्या बाबत सखोल तपास केला असता असे निदर्शनास आले की,नमूद गुन्ह्यातील आरोपी टोळी करून टोळीने गुन्हे करणारे तरबेज व सराईत धाडसी व कुख्यात व सक्रिय गुन्हेगार असून त्यांनी लातूर जिल्ह्यातील पोलीस ठाणे गांधी चौक, पोलीस ठाणे अहमदपूर व चाकूर तसेच नांदेड जिल्ह्यातील पोलीस ठाणे मुखेड हद्दीत स्वतःच्या आर्थिक लाभासाठी, संघटितपणे,वेगवेगळे साथीदार घेऊन टोळी निर्माण करून हिंसाचाराचा वापर व कट करून जीवे मारणे,जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे,बेकायदेशीर जमाव जमवून घातक हत्याराने दुखापत करणे, अवैधपणे अफूची तस्करी करणे यासारखे गंभीर गुन्हे करून दहशत निर्माण करून अवैध सावकारीच्या माध्यमातून स्वतःचे व टोळीतील साथीदाराचे आर्थिक फायदा करिता गुन्हे करतात. तसेच सर्वसामान्य जनतेमध्ये दहशत निर्माण करून लोकांच्या जीवितास व मालमत्तेस धोका निर्माण करणे, स्वतःचा व सोबतच्या साथीदारांचा आर्थिक फायदा करण्यासाठी स्वतःला भाई, दादा सिद्ध करण्याचा प्रयत्न करण्यात येत होता. असे निष्पन्न झालेने संघटित गुन्हे करणाऱ्या सदर आरोपीच्या टोळी विरुद्ध पोलीस उपमहानिरीक्षक श्री.निसार तांबोली यांच्याकडे मोक्का (MCOCA) कायद्यान्वये वाढीव कलमे लावण्याबाबत प्रस्ताव पोलीस अधीक्षकांच्या मार्फत पाठवून त्यास मोक्का लावण्याची पूर्वपरवानगी प्राप्त झाल्यानंतर पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री.निकेतन कदम हे करीत होते.
गुन्ह्याच्या तपासामध्ये तपासी अधिकारी उपविभागीय पोलीस अधिकारी चाकूर तथा सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री.निकेतन कदम व तपास पथक यांनी कसोशीने तपास करून आरोपीचे गुन्ह्यांचे पूर्व रेकॉर्ड संकलित करणे,आरोपींच्या स्थावर व जंगम मालमत्तेची माहिती संकलित केले.
तसेच सराईत आरोपी नारायण तुकाराम इरबतनवाड यांच्यासह टोळीतील इतर आरोपींचा राज्यातील विविध ठिकाणी तसेच देशातील 7 विविध राज्यात पाठलाग व शोध घेऊन त्यांना सीताफिने अटक करून गुन्ह्यामध्ये निष्पन्न करून आरोपींता विरुद्ध भक्कम व सबळ पुरावा गोळा करून दोषारोपपत्र मंजुरी करता अपर पोलीस महासंचालक मुंबई यांच्याकडे पाठवले होते.
त्यानुसार अपर पोलीस महासंचालक श्री.कुलवंत कुमार सारंगल यांनी सराईत आरोपी
1) नारायण तुकाराम इरबतनवाड,वय 45 वर्ष , राहणार शिरूर ताजबंद, तालुका अहमदपूर यांच्यासह इतर आरोपी विरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम 1999 (MCOCA) च्या कलम 3(1)(i), 3(2), 3(3), 3(4) प्रमाणे दोषारोप पाठविणेस मंजुरी दिली आहे.
सदर गुन्ह्यांमध्ये मोक्का (MCOCA) प्रमाणे तपास व दोषारोप पाठवण्यास मंजुरी मिळवण्याकरिता नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक श्री. निसार तांबोली, लातूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. निखिल पिंगळे,अपर पोलीस अधीक्षक श्री.अनुराग जैन,यांचे मार्गदर्शनात तपास अधिकारी सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री.निकेतन कदम व त्यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक बालाजी मोहिते, सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळासाहेब नरवटे, पोलीस उपनिरीक्षक राजाभाऊ जाधव, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक परमेश्वर राख,पोलिस अमलदार हनुमंत आराद्वाड, चंद्रकांत राजमाले,बाळासाहेब गडदे, पांडुरंग सगरे, संजीव मुंडे, महिला पोलीस अमलदार अश्विनी गडदे तसेच विधी सल्लागार एड.सारिका वायबसे यांनी मोक्का कायद्यान्वये दोषारोप पाठविण्यास मंजुरी करता व परिपूर्ण तपासा करता परिश्रम व सहभाग घेऊन उल्लेखनीय कामगिरी केली.
मोका(MCOCA) अन्वये कार्यवाही करण्यात आलेल्या टोळीतील आरोपींची नावे...
1. नारायण तुकाराम इरबतनवाड, वय 45 वर्षे राहणार शिरूर ताजबंद तालुका अहमदपूर जिल्हा लातूर
2. राजकुमार उद्धव गाटचेरले, वय 19 वर्षे राहणार मोरेवाडी तालुका अहमदपूर
3. सुधीर भागवत रापतवार, वय 19 वर्षे राहणार शिरूर ताजबंद तालुका अहमदपूर
4.अमोल नरसिंग कदम, वय 19 वर्षे राहणार शिरूर ताजबंद तालुका अहमदपूर
5. पुरुषोत्तम तुकाराम सुरनर, वय 19 वर्षे राहणार अजनसोंडा तालुका चाकूर
6. प्रशांत विलास कमळे, वय 19 वर्षे राहणार सय्यदपुर तालुका अहमदपूर
7. सादिक इसामुद्दीन शेख , वय 52 वर्ष राहणार शिरूर ताजबंद तालुका अहमदपूर
8. धनाजी तुकाराम इर्बतनवाड, वय 50 वर्षे राहणार शिरूर ताजबंद तालुका अहमदपूर
9. रमेश माधव भालेराव, 20 वर्षे राहणार शिरूर ताजबंद तालुका अहमदपूर
10. मार्कंडेय नारायण इर्बतनवाड, वय 19 वर्षे राहणार शिरूर ताजबंद तालुका अहमदपूर
11. अजितसिंग रघुवीरसिंग गहेरवार, वय 49 वर्षे राहणार कुमठा तालुका अहमदपूर