गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
उदगीर तालुक्यातील 19 जनांविरुद्ध तालुक्यात प्रवेश बंदीची
कारवाई
दोन वर्ष कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच सण उत्सव हे निर्बंधांमध्ये साजरे केले गेले.पण यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने सर्वच सण मोठ्या उत्साहात साजरे होत आहेत. त्यात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. 31ऑगस्ट पासून गणेशोत्सवाला सुरवात झाली असून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गणेश मूर्तीची स्थापना करण्यात आलेली आहे.
उदगीर शहरात गणेशोत्सव व विसर्जन काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी याकरीता उदगीर शहर व ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दी अंतर्गत येणाऱ्या,उत्सवच्या काळात धार्मिक तेढ निर्माण करून सरकारी कामात अडथळा करणारे,आदेशाचे उल्लंघन करणे,खुनाचा प्रयत्न करणे,दारू पिऊन लोकांना मारहाण करून जबर दुखापत करणे, बेकायदेशीर जमाव जमवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणे अशा प्रकारचे वर्तन करणारे लोकांवर तसेच अलीकडच्या काळात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या लोकावर उदगीर शहर व ग्रामीण पोलीस ठाणेच्या हद्दीतून दिनांक 04/09/2022 रोजी ते 06/09/2022 रोजी पर्यंत फौजदारी दंडसंहिता कलम 144 अन्वये "तात्पुरत्या स्वरूपात प्रवेश बंदीची" कारवाई उपविभागीय दंडाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी उदगीर यांचे कार्यालयाकडून करण्यात आलेली आहे.
उत्सव काळात लातूर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावे,गणेशोत्सव शांततेत पार पडावा यासाठी गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी, नागरिक,कार्यकर्ते यांची शांतता समितीची, पोलीस मित्र समितीची पोलीस स्टेशन स्तरावर बैठका घेण्यात आल्या असून गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांना गणेशोत्सव साजरा करण्या संदर्भात मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत.
लातूर पोलीस दलांकडे असलेल्या मनुष्यबळा व्यतिरिक्त इतर जिल्ह्यांतून सुद्धा अतिरिक्त पोलीस बंदोबस्त मागविण्यात आला आहे.
सार्वजनिक शांतता अबाधित राखण्यासाठी लातूर पोलीस दल सुसज्ज आहे.