किल्लारी येथील 1993 च्या प्रलयकारी भूकंपामध्ये मृत्यू पावलेल्या नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली
लातूर दि.30 (जिमाका):- 30 सप्टेंबर 1993 रोजी झालेल्या प्रलयकारी भूकंप झालेला आज या घटनेला 29 वर्ष पूर्ण झाली. पण आजही त्याच्या झळा औसा तालुक्यातील किल्लारी या गावाला जाणवताना दिसतात.
30 सप्टेंबर 1993 रोजी झालेल्या प्रलयकारी भूकंपामध्ये मृत्यू पावलेल्या नागरिकांना किल्लारी येथील स्मृतिस्तंभास आमदार अभिमन्यू पवार, जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी., उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) नितीन वाघमारे, औसा रेणापूर उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे, तहसीलदार भरत सूर्यवंशी, प्र.सरपंच युवराज गायकवाड , तहसीलदार भरत सूर्यवंशी, ग्रामसेवक तुकाराम बिराजदार , जिल्हा परिषद सदस्य सुभाष पवार , माजी सरपंच शंकरराव प्रसाद , कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापती किशोर जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी , विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच ग्रामस्थांनी पुष्पचक्र अर्पण करून व दोन मिनिटे मौन पाळून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.
यावेळी पोलीस प्रशासनाच्यावतीने बंदुकीच्या गोळ्याच्या तीन फेरीने सलामी देण्यात आली.