Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

श्री त्रिपुरा विज्ञान महाविद्यालय येथे 19 वा गणेश उत्सव उत्साहात साजरा


श्री त्रिपुरा विज्ञान महाविद्यालय येथे 19 वा गणेश उत्सव उत्साहात साजरा

श्री त्रिपुरा विज्ञान महाविद्यालय मध्ये गणेश चतुर्थी दिवशी श्रींची स्थापना करण्यात आली व त्यानंतर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विविध दिवशी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले व विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनासाठी माझी कॅबिनेट मंत्री तथा आमदार माननीय संभाजी पाटील निलंगेकर, अप्पर पोलीस अधीक्षक अनुराग जी जैन, व माननीय खासदार सुधाकर जी शृंगारे इत्यादी मान्यवरांचे मार्गदर्शन लाभले आणि गणेश विसर्जनाच्या दिवशी संस्थाध्यक्ष माननीय उमाकांत जी होनराव यांच्या हस्ते श्रींची आरती करून गणेश विसर्जनाला सुरुवात झाली. प्रसंगी बोलत असताना प्राध्यापक उमाकांत होनराव सरांनी विद्यार्थी कर्मचारी व पालक यांना श्रींचे महत्त्व आणि राष्ट्रनिर्माणासाठी विविध संस्कृती कार्यक्रमाची गरज आणि मनुष्याचे कर्तव्य काय असावे यासंबंधी मोलाचे मार्गदर्शन केले.


भव्य मिरवणुकीसह विद्यार्थी व कर्मचारी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विविध सांस्कृतिक कार्यक्रम प्रदर्शित करत विसर्जन पार पाडले. मिरवणुकीला उपस्थित श्री त्रिपुरा महाविद्यालयाच्या प्राचार्य तथा संस्थेच्या सचिव सौ सुलक्षणा केवळ राम मॅडम, कोषाध्यक्ष प्रा. प्रेरणा होनराव, कार्यकारी संचालक श्री ओंकार होनराव, उपप्राचार्य राजकुमार केदासे, प्रा.मनोहर कबाडे, श्री दीपक होनराव, प्रा.माऊली होनराव, अधीक्षक व गणेश मंडळाचे अध्यक्ष श्रीकृष्ण जाधव, गणेश मंडळाचे सचिव ज्ञानेश्वर पुरी, प्रा. राकेश चौधरी, प्रा.सुनील वर्मा, प्रा.राम शंकर यादव, प्रा.सतीश पाटील, प्रा.उज्वल कुमार, प्रा.उदित नारायण, प्रा.संजय शुक्ला, प्रा.ध्रुवदर्शन, प्रा.नीरज कुमार, प्रा.रुपेंद्रसिंह ठाकूर, श्री शेख ए. आर, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
Previous Post Next Post