संस्थापक अध्यक्ष संजय राठोड़ यांच्या हस्ते 'लाॅर्ड व्यंकटेशा'गणेश मुर्तीची स्थापना
लातूर-दोन वर्षे गणेश उत्सवावर निर्बंध होते. ..त्यामुळे लाडक्या गणरायाची सार्वजनिक ठिकाणी प्रतिष्ठापना करण्यात आली नव्हती.
यंदा मात्र, गल्लोगल्ली श्रींची प्रतिष्ठापना होत आहे. गेल्या काही दिवसांपासून लाडक्या बाप्पांची आतुरतेने वाट पाहणारे भक्तगण बुधवारी जयघोषात दंग होते. विघ्नहर्ता गणरायाचे आगमण होत असतानाच पावसाच्या सरीही बरसल्या.
एल आय सी काॅलोनी येथे दरवर्षा प्रमाणे याही वर्षी 'लाॅर्ड व्यंकटेशा'गणेश मुर्तीची पुजा करुन स्थापना ३१ ऑगस्ट रोजी संध्याकाळच्या १० वा करण्यात आली.
३१ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थी दिवशी गणरायाचे आगमन अगदी थाटा माटात करण्यात येते.या दिवशी अशीच लगभग गणेश भक्तांमध्ये सकाळी दहा वाजल्यापासुन चालू झाली.लहान मुलांपासुन ते अबाल वृध्दा पर्यंत आनंदाने मंडपापाशी गणेश मुर्ती आणण्यासाठी गोळा होत होते.दुपारी तिन च्या दरम्यान मुर्ती आणण्यासाठी ट्रॅक्टर सजवण्यात आले.यासाठी डीजे ही लावण्यात आला.
डिजेच्या तालावर लहनापासुन मोठ्यांपर्यंत सर्वजन थिरकू लागले.बगता बगता शेकडोंच्या संखेत गणेश भक्त जमा झाले.दिवसभर उन्ह आणि उकाडा होता. मात्र, सायंकाळी सहा नंतर ढगाळ वातावरण होऊन पाऊस झाल्याने भक्तगणांमध्ये उत्साह संचारला होता. आणि पावसाच्या थोङया व्यत्यया मुळे मुर्ती आणण्यासाठी रात्रीचे आठ वाजले.परंतू तरुणाईचे आपल्या लाडक्या बप्पासमोर नाचता नाचता रात्रीचे दहा वाजलेले कळालेच नाही.त्यानंतर आयोजकांनी मुर्ती स्टेजवर स्थापण करण्यात आली.मुर्ती अतिशय सुंदर,मोहक आणि भारदस्त असल्यामुळे थोडावेळ लागला.अगदी शिताफिने मुर्ती स्टेजवर आणण्यात आली.त्यानंतर संस्थापक अध्यक्ष संजय राठोड़ यांच्या हस्ते 'लाॅर्ड व्यंकटेशा'गणेश मुर्तीची पुजाकरुन स्थापना करण्यात आली.
.यावेळी गणेश मंडळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष सतिश मिरचे अप्पा , उपाध्यक्ष विक्रम पवार ,
कोषाध्यक्ष श्री कंठे , सहकोषाध्यक्ष संजय साळुंखे , सचिन राठोड , दीपक कदम
सजावट प्रमुख रमाकांत जाधव , प्रयोग राम विश्वनाथ स्वामी ,सांस्कृतिक अध्यक्ष घोडके सर, सचिव संजय राठोड , सहसचिव शिवाजी घोणे साईराज राठोड, विष्णू राठोड, जगदीश राठोड, सचिन राठोड़, प्रसिद्धीप्रमुख विष्णू आष्टीकर, राम पाटोळे ,संतोष अस्वार यांची उपस्थिति होती.