Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

डोगरशेळकी पशुवैद्यकीय उपकेंद्राची ईमारत धोकादायक अवस्थेत ,पशुपालकात नाराजी.

डोगरशेळकी पशुवैद्यकीय उपकेंद्राची ईमारत धोकादायक अवस्थेत   ,पशुपालकात नाराजी.


 
उदगीर(संगम पटवारी) तालुक्यातील डोगरशेळकी येथील पशुवैद्यकीय दवाखाना येथील नवीन इमारतीस तिस लक्ष रू.निधी मंजूर झाला होता.डोगरशेळकी परीसरात दुध उत्पादन व्यवसाय मोठ्या प्रमाणात आहे.त्यामुळे पशुपालकांची संख्या ही मोठ्या प्रमाणात असुन पशुपालकांच्या सोयीसाठी पशुवैद्यकीय आधारभूत उपकेंद्रच्या इमारतीकडे मात्र दुर्लक्ष झाल्याचे दिसत आहे.या उपकेंद्राच्या इमारतीच्या चारीबाजुने भिंतीला मोठ मोठ्या भेगा पडल्या होत्या.छताची अवस्था तर खुपच विचित्र होती छत ,बांधकामाची चक्क सळई उघडी पडली असुन छत पावसाने गळत होते त्यामुळे येथील कर्मचारी आत बसून काम करत असताना त्यांना आपला जिव मुठीत धरून काम करावे लागत होते.तर संरक्षण भितीची पण पडझड झाली होती उपकेंद्रामध्ये विज कनेक्शन उपलब्ध नाही त्यामुळे या उपकेंद्राला ओषधी ठेवण्यासाठी फ्रिज पण उपलब्ध नाही अशी दैनीय अवस्था या उपकेंद्राची झाली होती आता लवकरच नवीन इमारत तयार होणार असल्याने ग्रामस्थांमध्ये व पशुपालकामध्ये आनंदाचे वातावरण पहायला मिळत होते.
याआधारभुत उपकेंद्राचे कार्यक्षेत्र डोगरशेळकीसह परिसरातील नावंदी. पिरतांडा.डोगरशेळकी तांडा.आडोळ तांडा. आदी गावातील पशुपालक उपचारासाठी पशुधन घेऊन येत असतात मात्र या उपकेंद्राची नवीन इमारतीस आलेला निधीने काम लवकरात लवकर व्हावे असी चर्चा नागरिकांतुन होत आहे.काम का पुर्ण होत नाही या बाबतची चौकशी ची संमधीत विभागाणे करावी असी चर्चा मात्र सुरू आहे.
Previous Post Next Post