Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

शिवछत्रपती युवक गणेश मंडळ च्या वतीने घेण्यात आल्या विविध स्पर्धा

शिवछत्रपती युवक गणेश मंडळ च्या वतीने घेण्यात आल्या विविध स्पर्धा 


उदगीर(संगम पटवारी) छत्रपती शिवाजी महाराज चौक उदगीर येथील शिवछत्रपती युवक गणेश मंडळातर्फे यावर्षी विविध समाज उपयोगी उपक्रम राबवन्यात आले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त स्पर्धा आयोजित करण्यात आली होती त्यामध्ये स्वातंत्र्यासाठी लढणारे शौर्यविरावर भाषण स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेमध्ये 100 च्या वर विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता
  देशभक्तीपर गीत गायन स्पर्धा पार पडली त्यामध्ये 121 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता
 महामानव,महापुरुष,शेतकरी, कष्टकरी यांच्या वरील वेशभूषा स्पर्धा घेण्यात आली स्पर्धेमध्ये 150 च्या वर विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला* 
 या विविध उपक्रमामध्ये उदगीर शहरातील जवळपास 20 च्या वर शाळांनी आपला सहभाग नोंदला होता 
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळाचे अध्यक्ष दत्ता पाटील उपाध्यक्ष प्रशांत जगताप, कार्याध्यक्ष बाळासाहेब पाटोदे, कोषाध्यक्ष उत्तम मोरे, सचिव प्रकाश साखरे, सहसचिव संतोष फुलारी, मार्गदर्शक म्हणून सत्यवान बोरळकर,सिद्धेश्वर पाटील, धनाजी मुळे, सुधीर भोसले, भरत चामले, सुनील सावळे , उदय मुंडकर, झुंजार पाटील, दत्ता पाटील, सूर्यकांत मुक्कावार, गोपाळ पाटील, अजित पाटील, रामभाऊ हाडोळे, राजू बंडे, अहमद सरवार, सुभाष नागठाणे, विशाल पाटील, बिपिन पाटील, विक्रांत भोसले, प्रा मदन पाटील, शहाजी पाटील, पृथ्वीराज पाटील, यशवंत पाटील, विशाल तोंडचिरकर, अजिंक्य पाटील, महेश रेवते, सागर गाजरे, सतीश पाटील मानकीकर ,अंकुश ताटपल्ले ,आनंद भोसले ,हिमांशू पाटील, आशिष ठाकूर भाऊसाहेब जांभळे, विजय बामणीकर, रामदास माळेगावे, नारायण दापकेकर, आशिष पाटील, गिरीश जाधव, वैजनाथ बाबासाहेब पाटील, अभिजीत पाटील, मयूर वट्टमवार, अक्षय जाधव ,विशाल मुंडकर ,अभिजीत माळेगावे ,सुग्रीव बिरादार, केदार शंकर सुबोध वासरे, विशाल देवनाळे, शिवा उपरवाडे,पांडुरंग पाटील ,अमर कांबळे, व्यंकट पाटील ,मधुकर रेवते, श्रावण रितेश ,नवनाथ खुळे प्रा जावेद शेख यांनी मेहनत घेतली या स्पर्धांचे परिक्षक म्हणून प्रा.शुंकताला जाधव, कल्पना बिरादार, स्वाती हजारे, प्रतिभाताई मुळे हे होते तर संचलन प्रा राहुल अतनुरे व ज्ञानेश्वर बिरादार यांनी केले.
Previous Post Next Post