Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

लहान गोंडस बाळाला हातगाड्यावर सोडून जोडपे फरार..

गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
लहान गोंडस बाळाला हातगाड्यावर सोडून जोडपे फरार..


CCTV मध्ये असलेेले जोडपे तेच आहेत ,याची खातर जमा झाले नाही

लातूर : मूल होत नाही म्हणून देवाला नवस बोलण्यासह वैद्यकीय उपचारासाठी दवाखान्यांमध्ये लाखो रुपये खर्च करणारे अनेक दाम्पत्य पाहावयास मिळतात. मात्र, देवाने फुलासारखे दिलेले मूल नको म्हणून रस्त्यावर सोडून देणारे महाभागही आहेत, हा विकृतपणाच म्हणावा लागेल. लातुरातील महावितरणसमोरच्या रस्त्यावरील एका हातगाड्यावर अवघ्या आठ महिन्यांच्या गोंडस बाळाला सोडून जोडपे पसार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 

याबाबत माहिती अशी की, शहरातील साळे गल्लीतील महावितरण कार्यालयासमोरील रस्त्यावर शनिवारी (दि. १०) सकाळी एका हातगाड्यावर ८ महिन्यांचे गोंडस बाळ कोणीतरी ठेऊन गेल्याचे काही नागरिकांना निदर्शनास आले. त्यावेळी माजी नगरसेवक राजू आवसकर यांनी 'रिलीजिअन टू रिस्पॉन्सिब्लीटी' या संस्थेचे राहुल पाटील चाकूरकर यांना फोन करुन बाळाची माहिती दिली. त्यांनी लागलीच बेवारस मुलांच्या संगोपनाची काळजी घेणाऱ्या कलापंढरी या 'चाईल्ड लाईन' सेवाभावी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना बोलावले. त्यानंतर तेथे विचारपूस केली. मात्र कोणीही बाळाबद्दल माहिती दिली नाही. म्हणून कलापंढरी संस्थेने बाळाची जबाबदारी घेतली. बाळ सध्या त्यांच्याकडे सुखरुप आहे 
Previous Post Next Post