नळेगाव रोडवर असलेल्या जुगार अड्डयावर धाड;एका पोलीसासह १४जणांविरुद्ध गुन्हा
उदगीर प्रतिनिधि/ संगम पटवारी
उदगीर ग्रामीण पोलिस स्टेशन हद्दीतील नळेगाव रोडवर असलेल्या एका धाब्याच्या पाठीमागील पत्र्याच्या शेडमध्ये तिरंट नावाच्या जुगार खेळला जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आल्यावरून या अड्डयावर सहाय्यक पोलीस अधिक्षक निकेतन कदम यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी धाड टाकून एक लाख ८२ हजार ३४० रुपयांच्या रोख रकमेसह ९ लाख २१ हजार रुपये किमतीचे मोबाईल, वाहने आणि जुगाराचे साहित्य असा एकूण ११ लाख ३ हजार ३४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.विशेष म्हणजे याप्रकरणी एका पोलीस हवालदारासह एकूण १४ जणाविरुद्ध उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात
६ सप्टेंबर रोजी उदगीर शहरातील गणरायांचे विसर्जन होते. यामुळे पोलिसाचा जिल्हाभरातील मोठा फौजफाटा बंदोबस्तासाठी उदगिरात तैनात होता. मंगळवारी रात्री गणेश विसर्जन संपल्यानंतर कदम यांनी बुधवारी (दि. ७) पहाटे पावणेतीनच्या सुमारास उदगीर ग्रामीण पोलिसांना सोबत घेऊन उदगीर ते नळेगाव रोडवरील इंद्रसेन धाबा येथे पाठीमागील पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या जुगार इतरांनी सांगितले अड्ड्यावर धाड टाकून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी पत्त्यावर पैसे लावून तिरंट जुगार खेळताना १३ जणांना ताब्यात घेतले तर पोलिसांची चाहूल लागताच देवणी पोलिस स्टेशन मध्ये असलेले पंकज सुधाकर चंचलवाड अंधाराचा फायदा घेवून पळून गेल्याचे सांगण्यात आले आहे
याप्रकरणी पोलीस हवालदार राम विश्वंभर बनसोडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी दत्तात्रेय रामराव हंदीकेरे (रा. तोंडचिर ), संदीप किशन चव्हाण (रा. मल्लापूर) सुनील भोजा चव्हाण (रा. मल्लापूर), अविनाश अशोक शिंदे (रा. तोंडचिर ), विलास शंकर शिंदे (रा. भालकी, जि. बीदर ), शैलेंद्र उद्धव वडगावे (रा. मलकापूर), राजेश प्रभू चव्हाण (रा. कौळखेड), लक्ष्मण कोंडीबा भंडारे(रा. कासारखेडा, ता. लातूर), प्रवीण बालाजी पाटील (रा. औराद बान्हाळी, जि. बीदर), रामेश्वर बैजनाथ बेलुरे (रा. भालकी, जि. बीदर), मधुकर कोंडीबा सूर्यवंशी (रा. उदगीर), शुभम (रा. सोमनाथपूर, उदगीर), अक्षय अरविंद गायकवाड (रा. उदगीर) व देवणी पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार पंकज सुधाकर चंचलवाड या १४ जणांविरुद्ध गु. र. नं. ४१३ / २२ कलम ४, ५ महाराष्ट्र जुगार कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक तानाजी चेरले करीत