गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
लातूरात मध्ये ट्युशन एरियातून मुलाचे भरदिवसा अपहरण..
पोलिसांनी मुलाची केली सुटका; एक आरोपी ताब्यात
लातूर :लातूर मध्ये आता गुन्हेगारांची हिम्मत एवढी वाढली आहे की,आपण नेमके कोणाचे मुलाचे अपहरण करतो ते विसरून गेले आहेत,कारण शिवाजी नगर पोलिसांचा धाक शुन्यावर येवून पोहचला आहे.त्याचे कारण काही अधिकार्यांमध्ये असलेली भ्रष्टाचार आणि हप्तेखोरीने सराईत गुन्हेगारांवर नजर कमजोर पडली आहे, त्यांचे कारणही तसेच घडले आहे. घरातून ट्युशनला जाण्यासाठी बाहेर पडलेल्या एका महिला पोलिसाच्या अल्पवयीन मुलाचे भरदिवसा चार-पाच जणांनी अपहरण केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी दुपारी लातूर शहरात घडली आणि शहरात एकच खळबळ उडाली. अपहरणाची माहिती पोलिसांना समजल्यानंतर ट्युशन एरियात दोन ते तीन तास तपास मोहीम राबवून एका खोलीत डांबलेल्या मुलाची सुटका करण्यात पोलिसांना यश आले आहे.एका आरोपीस ताब्यात घेण्यात आले असून. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती..
लातूर शहरातील एका पोलीस ठाण्यातील महिला पोलीस कर्मचाऱ्याचा मुलगा दहावीत शिक्षण घेत असून उद्योग भवन परिसरातील खाजगी ट्युशन मध्ये शिकवणीसाठी जातो. नेहमीप्रमाणे गुरुवारी दुपारी मुलगा ट्युशनला अशोक हॉटेल परिसरातून जात असताना पाच सहा जणांनी त्यास अडविले व पकडून ट्युशन एरियात घेऊन गेले आणि एका खोलीत बंदिस्त केले. अपहरण झाल्याची माहिती मित्रांनी त्या मुलाच्या घरी सांगितल्यानंतर पोलिसांनी कसून शोध सुरू केला. रात्री पावणेआठ वाजेपर्यंत शोध मोहीम सुरू होती. अखेर एका खोलीत अपहरण केलेला मुलगा सापडला आणि त्याची सुटका करण्यात आली. त्यावेळी एका आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेतले.आरोपीस शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आणून त्याची कसून चौकशी केली जात आहे. तसेच फरार असलेल्या इतर आरोपींची माहिती घेतली जात आहे.
"सदर आरोपी सराईत गुन्हेगार असल्याचे समजते,पण मुलगा सुखरुप असला तरी मात्र आता पोलिसांच्या घरापर्यंत जाण्याची हिम्मत आज हे गुन्हेगार करत आहेत.मागील काहि महिन्यांपुर्वी मुलांना पकडून त्यांच्याकडून जबरन पैसे उकळले जात होते,तेही आरोपी सराईत गुन्हेगार होते.पोलिसांवर टिकेची झोड उटल्यानंतर त्यांच्यावर कार्यवाही करण्यात आली.त्यानंतर नशेच्या गोळयांचा बाजार करणार्या गुन्हेगारांना अटक करण्यात आली होती आणि आता तर अपहरण तेही चक्क पोलिसांच्याच मुलाचे.. हे अति झाले आहे असे वाटत नाही का..? यावर पोलिस अधिक्षक निखिल पिंगळे यांनी गंभीर दखल घेवून अधिकारी बदल करणे अवश्यक बनले आहे."