त्रिपुरा महाविद्यालयामध्ये मा.आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्या हस्ते करण्यात आली आरती
श्री त्रिपुरा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयामध्ये दिनांक 3-9-2022 रोजी सायंकाळी ठीक 6:45 वाजता माझी कॅबिनेट मंत्री तथा मा. आमदार संभाजी पाटील निलंगेकर व अनेक कार्यकर्त्या समवेत श्री ची आरती करण्यात आली प्रसंगी भाजपा युवा मोर्चा प्रदेश सचिव प्रेरणाताई होनराव संस्थेचे कार्यकारी संचालक श्री ओंकार होनराव व कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते श्रीच्या आरतीनंतर विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले प्रसंगी बोलत असताना माननीय आमदार संभाजी भैय्या निलंगेकर यांनी आई-वडील गुरुजन वर्ग व आप्तसंबंधी अशी कसे बोलावे कसे वागावे अशा प्रोत्साहन पर संबोधित केलेत्यावेळी उपस्थित मनीष बंडेवारजी, शिरीष कुलकर्णी, ज्योतीराम चिवडे, दगडू चेअरमन, गणेश गोमसाळे जी, विशाल हवा पाटील जी, श्री त्रिपुरा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयाचे कार्यकारी संचालक ओंकार होनराव, श्री त्रिपुरा गणेश मंडळाचे अध्यक्ष श्रीकृष्ण जाधव, उपाध्यक्ष राजकुमार केदासे, सचिव ज्ञानेश्वर पुरी, कोषाध्यक्ष दीपक होनराव व महाविद्यालयाचे सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.