ट्युशन एरिया मध्ये पुन्हा एकदा चाकूचा धाक दाखवून विद्यार्थ्याला लुटले
लातूर : ट्युशन एरिया मध्ये सायंकाळी शिकवणीला दुचाकीवरून निघालेल्या एका विद्यार्थ्याला उड्डापुलाखाली पाच ते सहाजणांनी अडवून चाकूचा धाक दाखवून त्याच्या खिशातून पैसे काढून घेतल्याची धक्कादायक घटना गुरुवारी घडली. याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात सहाजणांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहिती नुसार गुरुवार,दि १५ सप्टेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास दोन विद्यार्थ्यां आपल्या दुचाकीवरून खासगी शिकवणीसाठी जात होते. त्यावेळी त्यांना पाच ते सहा जनांच्या टोळक्याने त्यांची दुचाकी उड्डाणपुलाच्या परिसरात वाटेतच अडवून. त्यातील
एकाने थांब... मला ओळखत नाहीस का? मी गणेश आहे. आम्ही पंकजच्या टोळीतील आहोत म्हणून चाकूचा धाक दाखविला. दरम्यान, यावेळी दुचाकीवर असलेला चालकाचा मित्र घाबरुन पळून गेला. त्या टोळक्याने त्या विद्यार्थ्याच्या पॅन्टच्या खिशातील ५४० रुपये जबरदस्तीने काढून घेतले. ही घटना कोणाला सांगितली तर पुन्हा उद्योग भवन परिसरात फिरू देणार नाही, असे धमकावले. याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून एकूण सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुन्हा एकदा विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.काही अधिकार्यांच्या भ्रष्टाचारी सवयी मुळे हे असे टोळके मोकाट जनावरासारखे फिरत आहेत.पोलिस अधिक्षक निखिल पिंगळे यांनी चार्ली पोलिसांना या भागात गस्त घालून अशा टवाळखोर मुलांना वेळीच आवर घालने गरजेचे बनले आहे पोलिसांकडून त्या टोळक्यांचा शोध घेतला जात आहे.