अमेरिकेत मोदी, जगनमोहन रेड्डी, अदानींविरोधात खटला दाखल..!
अमेरिकेतील एका भारतीय वंशज डॉक्टरने पंतप्रधान नरेंद्र मोदी, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय. एस. जगनमोहन रेड्डी आणि दिग्गज उद्योजक गौतम अदानी यांच्याविरुद्ध ५३ पानांचा खटला दाखल करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे भ्रष्टाचार,मनी लाॅंडरिंग, पेगासस स्पायवेअरच्या मुद्द्यांवरून कोलंबिया जिल्हा न्यायालयाने मोदींसह सर्वांना समन्स बजावले आहे.
अमेरिकेच्या व्हर्जिनिया राज्यातील रिचमंड शहरातले प्रख्यात गॅस्ट्रोएंटेरोलॉजिस्ट डॉ.लोकेश वुयुररू यांनी हा खटला दाखल केला आहे. पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री रेड्डी, अदानी, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे अध्यक्ष तथा संस्थापक प्रोफेसर क्लॉस श्वाब यांच्यासह इतर काही जणांना डॉ. लोकेश यांनी प्रतिवादी केले आहे. मोदींसह इतर प्रतिवादी भ्रष्टाचारी असून, त्यांनी अमेरिकेत मोठ्या प्रमाणात रोख पैसे पाठवले आहेत, तसेच त्यांनी पेगासस या स्पायवेअरचा वापर करून आपल्या राजकीय विरोधकांची हेरगिरी केली आहे, असा आरोप याचिकेत करण्यात आला आहे; . २४ मे रोजी खटला दाखल करण्यात आला होता. कोलंबिया जिल्हा न्यायालयाने या याचिकेच्या आधारावर २२ जुलै रोजी समन्स बजावले आहे. भारतात हे समन्स ४ ऑगस्ट रोजी, तर श्वाब यांना २ ऑगस्ट रोजी मिळाल्याची माहिती संपुर्ण भारतात वार्यासारखी पसरली.आता या खटल्याचा काय निकाल लागणार याकडे आता संपुर्ण भारताचे लक्ष लागले आहे.
Tags:
Crime News