सौ चुहे खाके,बिल्ली चली हज को..
जाहिरातीने एक ही मुलगा क्लासेसला आला नाही..
पैशाच्या जिवावर शिक्षणाचा 'संकल्प' करणार्या प्राध्यापकाने उधळली मुक्ताफळे
लातूर (प्रतिनिधी)- वैद्यकीय शिक्षणाचे प्रवेशद्वार असलेल्या नीट परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. दरम्यान, डॉक्टर होण्यासाठी आवश्यक दर्जेदार तयारीसाठी नामांकित असलेल्या कोटा पटनेच्या धर्तीवर आणि त्याच्या तोडीचे शिक्षण देऊ असा शिक्षणाचा 'संकल्प' करणार्या प्राध्यापकाने जाहिरातीने एक ही मुलगा क्लासेसला आला नाही अशी मुक्ताफळे उधळली असुन वास्तविक पाहता या प्राध्यापकाने आपल्या क्लासेसच्या जाहिराती ,जेव्हा क्लास चालू केला तेंव्हापासून आजपर्यंत मोठमोठ्या प्रसारमाध्यमांनी लाखोंरुपये खर्चुन देण्यात आल्या आणि या जाहिरातीच्या व सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या पैशावर आज तो एसी केबिन मध्ये मुलांना शिकवत असतो.प्रत्येक वर्षी करोड़ों रुपया च्या जाहिराती देवून हजारोंची गर्दी जमवणार्या या प्राध्यपकाने मात्र आपली सतसद विवेक बुध्दी विकली कि काय..?असा प्रश्न आता जाहिरात वर्गा मध्ये काम करणार्या मध्ये पडला आहे.प्रत्येक क्षेत्रा मध्ये आपली वयक्तीक, व्यावसायिक आणि काॅर्परेट कंप़न्या आपल्या बजट मधून २०%रक्कम हि जाहिरातीसाठी राखून ठेवतात मात्र या Physics शिकवणार्या आणि चांगले शिक्षण देण्याचा 'संकल्प'करणार्याने मात्र मोठमोठ्या कंपन्यातील आणी प्रसारमाध्यमातील जाहिरात प्रतिनिधि नां अक्षरश:वेङयात काढल्याचे आता स्पष्ट होत आहे.विशेष म्हणजे मी एवढे वर्ष दिलो,यापुढून एकही जाहिरात देणार नाही अशी मुक्ताफळे उधळून स्वत:ची बुध्दीमत्ता पाजळली. जाहिरात देणे किंवा न देणे, अथवा कोणाला देणे किंवा न देणे हा सर्व़स्वी अधिकार देणार्यांना असतो परंतू ज्या जाहिरातीमुळे आज लातूर मधील शिकवणी भागात भली मोठी जागा घेवून करोडोंरुपये कमावल्यांनी अशी मुक्ताफळे उधळने म्हणजे "सौ चुहे खाके,बिल्ली चली हज को..असाच प्रकार दिसत आहे.
NIIT निकालाच्या आनंदात विद्यार्थ्या सह 'संकल्प' करणार्या प्राध्यापकाचा नंगा नाच
काही दिवसा पूर्वी NEET UG चा निकाल जाहीर झाला या निकालात 'संकल्प' च्या विद्यार्थ्यांनी चांगले गुण मिळवून सरांचे नाव केले. पन या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि ट्युशन ऐरियात मिरवणूक काढून सरांनी आणि अकॅडमीच्या वतीने सोमवार दि.१२ रोजी दुपारी ४ वाजल्यापासून ते रात्री११पर्यंत जो काय तो तमाशा केला त्याबद्दल संपुर्ण लातूर शहरात चर्चा होवू लागलीआहे. राज्यातच काय पण देशात लातूर पॅटर्न चे नाव आहे. या लातूर पॅटर्नला सरांनी आणि त्यांच्या अकॅडमी कडून गालबोट लावण्याचे काम करण्यात आले आहे असे म्हणले तर चुकीचे ठरणार नाही!
असा बेजबाबदार पणाचा तमाशा करुन काय साध्य केले..? ते ही DJ लावून आणि हातात आगीचे लोट तयार मुले नाचत होती,अक्षरश:विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळ करण्यात आला. DJ च्या आवाजामुळे 5 ते 6 तास आजू बाजूच्या क्लास मधील आणि रिडींग रूम मधील आभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना जो त्रास सहन करावा लागला या कडे सरांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले असे चित्र दिसत होते. या DJ च्या आवाजामुळे बाजूच्या नामांकित क्लास चालकाला एक बॅच दुसऱ्या बिल्डिंग मध्ये घ्यावी लागली. त्यांच्या कडून असे कृत्य निंदनीय आहे. लातूर पॅटर्न हा सुसंस्कृत म्हणून ओळखला जातो लातूर मध्ये लोक असे तमाशे कधी सहन करत नाहीत याबाबत विद्यार्थीच भविष्यात त्यांना उत्तर देतील यात काही शंका नाही.