प्रादेशिक परिवहन विभाग आणि माझ लातूर परिवार यांच्या तर्फे चालकांचा सत्कार
प्रादेशिक परिवहन विभाग आणि माझ लातूर परिवार ,लातूर जिल्हा ट्रव्हल्स असोशियशन शहर वाहतूक शाखा,यांच्या तर्फे देशातील दळणवळण व परिवहन क्षेत्रातील वाहन चालक हा अत्यंत महत्वाचा घटक असून, त्याची अनन्यसाधारण भूमिका आहे. देशाच्या विकासामध्ये महत्वपूर्ण योगदानाबाबत चालकांचा उचित सन्मान करण्याच्या दृष्टीने चालकांचा सत्कार शनिवार दि.17सप्टेंबर रोजी सायंकाळी 9वाजता अशोक हाॅटेल येथे चालक दिनाचे औचित्य साधून चालकांना पुष्प व शुभेच्छा देऊन उचित सन्मान करण्यात येणार आहे.यासाठी परिवहन आयुक्त अविनाश ढकाणे यांनी नुकतेच पत्रक काढल्यानुसार लातूर येथे हा कार्यक्रम करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती मोटर वाहन निरिक्षक शितल गोस्वामी आणि पोलिस निरिक्षक शहर वाहतूक शाखा सुनिल बिर्ला, पोलिस उप निरीक्षक शहर वाहतूक शाखा अवेज काजी व लातूर जिल्हा ट्रव्हल्स असोशियशन सुनिलजी देशपांडे, राधिका ट्रव्हल्स चे संचालक शाम तोष्णिवाल,माझ लातूर परिवार चे सम्माननीय सतिशजी तांदळे सर यांच्या सह ईतर मान्यवरांच्या उपस्थितित कार्यक्रम करण्यात येणार आहे.तरि या कार्यक्रमासाठी सर्व ट्रॅव्हल्स चालकांनी अशोक हाॅटेल येथे वेळेवर उपस्थित राहण्याचे अवाहन सोमनाथ मेदगे यांच्या वतिने करण्यात आले आहे.