नवीमुंबई पोलीसदलातील कर्मचार्यांचा सेवापुर्ती कार्यक्रम..
नवी मुंबई पोलीस दलातील , पोलिस दळणवळण व माहीती तंत्रज्ञान विभागातील सन २०१६ मध्ये भरती झालेल्या बॅच कर्मचारी यांची सहा वर्षे सेवा पुर्ण झाली असल्याचे औचित्य साधून गणपति बंदोबस्त संपल्यावर सेवापुर्ती कार्यक्रम घेण्यात आला ,या खेळमेळीचे वातावरणात नवी मुंबई येथे साजरा करण्यात आला. दिवंगत ,राजु कुदळे ,गणेश जरांडे , व कोरोना योध्दे यांना श्रध्दांजली वाहण्यात आली.यावेळी पोलिस निरिक्षक श्रीकांत वेनेगुरकर यांच्या हस्ते मोमेंटो देण्यात आली. अनेक उपक्रमासह सर्वांनी राष्ट्रसेवा संकल्प" खाकीचीही नशा अशीच वाढत जावी अन खारीच्या वाट्याने देशसेवा घडावी " हा संकल्प केला. संयोजनाच्या नवीन उर्जेसह १६ चे बॅच अंमलदाराना पुढील कालखंडासाठी शुभेच्छा!! देण्यात आल्या.