श्री नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त ..
सेवा पंधरवाडा सप्ताह अंतर्गत मोफत नेत्ररोग तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे उद्घाटन











देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवाडा सप्ताह अंतर्गत भारतीय जनता पार्टी लातूर शहर आयोजित मोफत नेत्ररोग तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे उद्घाटन दि. १७ सप्टेंबर २०२२ रोजी महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री मा ना श्री सुरेशजी खाडे यांच्या हस्ते शासकीय रुग्णालय येथे संपन्न झाले. या शिबिरात २०० गरजू व्यक्तींच्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया होणार आहेत. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. मनीष बंडेवार यांनी केले. श्री. गुरुनाथ मगे व डॉ. सुधीर देशमुख यांनी विचार व्यक्त केले. कामगार मंत्री मा ना श्री सुरेशजी खाडे यांनी यथोचित मार्गदर्शन करताना मोतिबिंदु शस्त्रक्रीयेसाठी सर्वतोपरी आर्थिक मदत करण्याची ग्वाही दिली व मा पंतप्रधान मोदीजींनां वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. किशन बडगिरे यांनी केले व आभार प्रदर्शन ॲड. विजय अवचारे यांनी केले. या प्रसंगी लातूर शहर जिल्हाध्यक्ष श्री. गुरुनाथ मगे, संघटन सरचिटणीस श्री. मनीष बंडेवार, सेवा पंधरवाड्याचे संयोजक श्री. किशन बडगिरे, सहसंयोजक ॲड. श्री. विजय अवचारे, अधिष्ठाता डॉ. श्री. सुधीर देशमुख, नेत्र विभागाचे प्रमुख डॉ. श्री. उदय मोहिते , वैद्यकीय अधीक्षक डॉ. श्री. संतोष डोपे तसेच भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस श्री. प्रवीण सावंत, श्री. शिरीष कुलकर्णी, प्रदेश प्रवक्त्या प्रेरणाताई होनराव, मंडल अध्यक्ष श्री. ललित तोष्णीवाल श्री. ज्योतिराम चिवडे, श्री, सतीश ठाकूर, श्री, संजय गिर , श्री. विशाल हवा पाटील ॲड. श्री. प्रदीप मोरे , श्री सुरेश राठौड़, श्री धनंजय हाके,श्री. बाबा गायकवाड, श्री, मुन्ना हाशमी सौ. अर्चनाताई आल्टे, सौ. निर्मलाताई कांबळे, सौ. रोहिणीताई देशमुख, सौ. आफरीन खान, सौ. वर्षाताई कुलकर्णी, श्री. संदीप सोनवणे . श्री. किशोर काळे, श्री. बाळासाहेब शिंदे, व सर्व प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ता बंधू भगिनी उपस्थित होते.