संजय राऊत यांच्या जामिन अर्जावर गुरुवारी सुनावणी
मुंबई: मनी लॉंड्रिंग प्रकरणात ईडीच्या कोठडीत असलेल्या शिवसेना खासदार संजय राऊत यांनी जामीनासाठी अर्ज केला आहे. मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टात त्यांनी हा अर्ज दाखल केला असून यावर उद्या म्हणजे गुरुवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे. ईडीने खासदार संजय राऊत यांना गोरेगाव पत्राचाळ घोटाळा प्रकरणी मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली अटक केली आहे.