Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

तरुणावर केला तिघांनी कत्तीने वार..!


Ads by Eonads
गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
तरुणावर केला तिघांनी कत्तीने वार..!


लातूर : औसा रोड परिसरात सतत कोणत्या ना कोणत्या कारणावरुन कत्तीने हमले होत आहेत,कधी गाड्या फोडणे,कधी हातात कत्ती घेवून दहशत माजवणे याबरोबर एक खुन ही झाला या सतत च्या होणार्या दहशतीच्या वातावरणावर शिवाजी नगर पोलिस स्टेशन च्या पोलिस निरिक्षकाचे कंट्रोल राहिले नसुन वेळीच नेतृत्वाचे बदल करणे अवश्यक बनले असल्याचे आता उघड बोलले जावू लागले आहे.औसारोड परिसरात अशा घटनांना आवर घालण्यासाठी पोलिस चौकी पण करण्यात आली तरिही अशा घटनेमध्ये वाढ होत आहे. . चार दिवसांपूर्वी पुन्हा असाच राडा नंदी स्टॉप परिसरात झाला असुन एका २० वर्षीय तरुणावर तिघांनी मिळुन कत्ती आणि चाकुने हल्ला करुन गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
"पोलिस अधिक्षक साहेबांनी स्कुटी च्या तपासणीला आता प्राधान्य देणे अवश्यक बनले असुन या स्कुटीच्या डिक्की मध्ये हे कत्ती सारखे धारधार शस्त्रे ठेवण्यात येत असल्याची माहिती समोर येत आहे."

 काही दिवसांपूर्वी धिरज उर्फ बबलु अर्जुन सोनकांबळे (वय २०, रा. गायत्री नगर लातूर) आणि प्रशांत कांबळे व त्याच्या मित्रांसोबत (सर्व रा. विठ्ठल नगर, लातूर) वाद झाला होता. प्रशांत कांबळे आणि त्याच्या अन्या दोन साथीदारांनी मिळुन धिरज सोनकांबळे याच्यावर हल्ला केला. यावेळी, धिरजने त्याच्या हातातील धारदार कत्तीने पाठीत कमरेच्यावर दोन ते तीन वार केले. तसेच, त्याच्या सोबत असलेल्या एका मित्राने त्याच्या जवळील चाकुने बरगडीजवळ वार करुन गंभीर जखमी केले तर तिसऱ्या मित्राने लाथा बुक्यांनी मारहान करुन जिवे मारण्याची धमकी दिली.
या संदर्भात जखमी धिरज सोनकांबळे यांनी दिलेल्या तक्रारिवरुन शिवाजीनगर पोलिसांत गुरनं ३८१/२२ कलम ३०७, ३२३, ५०४, ५०६, ३४ भादंवि सह कलम ४, २५ भारतीय हत्यार कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढिल तपास सपोनि राठोड हे करित आहेत
Previous Post Next Post