वैधानिक विकास मंडळाला मुदतवाढ द्या..!
मराठवाडा जनता विकास परिषदेचे लक्षवेधी धरणे निदर्शने
अहमदपूर दि.17
मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी वैधानिक विकास मंडळाबरोबरच इतर विकास मंडळांना सुद्धा तातडीने मुदतवाढ द्यावी, मराठवाड्यावरील अन्याय थांबवावा या प्रमुख मागण्या घेऊन मराठवाडा जनता विकास परिषद तालुका शाखा अहमदपूर च्या वतीने येथील तहसील कार्यालयासमोर धरणे व निदर्शने आंदोलन करण्यात आले.
आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्ताने तिरंग्याचे ध्वजारोहण झाल्यानंतर मजवि परिषदेच्या वतीने हातामध्ये मागण्यांचे फलक घेऊन 'मराठवाडा वरील अन्याय बंद करा' 'मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी वैधानिक विकास मंडळांना मुदतवाढ द्या' आदी मागण्यांचे फलक घेऊन प्रशासनाचे आणी जनतेचे लक्ष वेधून घेतले. त्यानंतर उपरोक्त घोषणा देत येथील उपविभागीय अधिकारी कार्यालय दणाणून सोडले होते. तालुका शाखेच्या वतीने उपजिल्हाधिकारी प्रवीण फुलारी यांच्याकडे मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
या निवेदनावर जनता विकास परिषदेचे तालुका सचिव डॉ. सिद्धार्थकुमार सूर्यवंशी, पत्रकार अजय भालेराव गणेशराव मुंडे,प्रशांत जाभाडे,गौरव चवंडा, अरुणभाऊ वाघंबर, सचिन बानाटे,नागनाथ कांबळे,अण्णाराव सूर्यवंशी,पिराजी कांबळे, निवृत्ती केंद्रे,विनायक सुरनर,मारुती कांबळे, प्रा.डॉ.बालाजी कारामुंगीकर,सिद्धार्थ बनसोडे,गंगाधर साखरे, राहुल गायकवाड,गोविंद लोहबंदे,आक्रम पठाण, प्रभाकर गायकवाड, काकासाहेब घाडगे, आर.जी.सूर्यवंशी आदींची उपस्थिती होती.