पत्रकाराची तब्यत बिघडल्याने शासकिय रुग्णालयात दाखल
उदगीर(संगम पटवारी) मागील ५९ दिवसापासून उदगीर शहरातील नांदेड बिदर रोडवरील शंभर फुटाच्या आतील अतिक्रमण काढण्यात यावे मागणीसाठी मराठी पञकार संघ व इतर पत्रकारांच्या वतीने बेमुदत धरणे आंदोलन सुरु असुन या धरणे आंदोलन पञकाराच्या जीवावर बेतले आसल्याचे चिञ आहे
शहरातील आतिक्रमण हटवून रस्ता व नालीचे कामे करावे
मागणीसाठी पञकारांनी
888
राज्यपाल,आयुक्त,जिल्हाधिकारी,बांधकाम विभाग यांना वेळोवेळी निवेदने देऊन वारंवार विनंती करून सुद्धा आंदोलनाच्या ५९ दिवसानंतर ही उदगीर शहरातील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यासंदर्भात प्रशासनाकडून कुठलीही कारवाई करण्यात आली नाही त्यामुळे पञकारांनी पुकारलेल्या बेमुदत आंदोलनातील ठिकाणी पञकार पाऊस, ऊन ,वरा थंडी असतांनाही आंदोलन केल्याने तसेच आंदोलनाची धास्ती खाऊन पञकार संदीप पाटील यांची तबियत खालावल्याने त्यांना शासकिय रुग्णालयात दाखल करावे लागले . प्रशासनाने कार्यवाही केलीनाही तर आंदोलन आंदोलक पञकाराच्या जिवावर बेतनार ?प्रशासनास आतातरी जाग येईल का ? असा सवाल उदगीरकरांना पडला आहे.