Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान!

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान!

पिंपरी चिंचवड शाखेच्या वतीने शिक्षक दिन साजरा




पुणे, पिंपरी- चिंचवड : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ पिंपरी चिंचवडच्या वतीने माजी नगरसेविका अनुराधाताई गोरखे व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान करून शिक्षक दिन साजरा करण्यात आला.
शिक्षक विद्यार्थी घडवतात, देशाचे भविष्य घडवितात त्यांचा सन्मान करून त्यांच्या कार्याची दखल घेतली जावी व पुढील कार्यासाठी त्यांना प्रोत्साहन दिले जावे, या उद्देशाने शिक्षक दिनाचे औचित्य साधून शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. 
दिनांक ५ सप्टेंबर, २०२२ रोजी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ पिंपरी चिंचवडच्या वतीने माजी नगरसेविका आदर्श शिक्षिका व माजी शहर सुधारणा समिती सभापती अनुराधाताई गोरखे, शिक्षण क्षेत्रात आदर्श योगदान दिल्याबद्दल राजर्षी शाहू महाराज विद्यालय चिंचवड येथील सहशिक्षिका रूपाली प्रशांत पवार, स्टुडन्ट अकॅडमीचे संचालक विजय सोनवले, गणेश इंटरनॅशनल स्कूलच्या शिक्षिका अनु सिंघ, इंदिरा कॉलेजच्या प्राध्यापिका डॉ. अर्चना साळवे, वाव किड्सच्या संस्थापक स्नेहल सरोदे आदी मान्यवरांचा येथोचित सन्मान करण्यात आला.
888
यावेळी अनुराधाताई गोरखे यांनी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे आभार मानले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
तसेच सत्कारमूर्ती सर्व आदर्श शिक्षकांनी संघाचे आभार मानून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे पश्चिम महाराष्ट्र संघटक श्रीनिवास माने, पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष संतोष रणसिंग, महीला शहराध्यक्षा मंदा बनसोडे, उपाध्यक्षा उषा लोखंडे आदी पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
Previous Post Next Post