Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

'बियाणी' हेलिकॉप्टर मधून टाकणार्यांनी सामाजिक उपकृमाचा उडवला धज्जा

'बियाणी' हेलिकॉप्टर मधून टाकणार्यांनी सामाजिक उपकृमाचा उडवला धज्जा





लातूर (प्रतिनिधी) -। बंसल क्लासेस महाराष्ट्र प्रदेश चे मुख्य प्रवर्तक तथा अध्यक्ष राजस्थानी। मल्टीस्टेट को. ऑप. क्रेडिट सो. सा. लि. परळी वैजनाथ मा. चंदुलालजी मो. बियाणी यांच्या आयोजनाने व जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते लातूर जिल्ह्यातील पर्यावरण संतुलन राखण्यासाठी वन्य भागात दि. २७ सप्टेंबर ते २९ सप्टेंबर रोजी हेलिकॉप्टरच्या माध्यमातून लाख बियांचे बीजारोपण (वड, चिंच, लिंब व पिंपळ) करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये सागण्यात आले होते.सार्वजनिक उपक्रम असल्यामुळे जिल्हाधिकारी यांनी संमती दर्शवली त्यासोबतच प्रसारमाध्यमांनीही बातम्या प्रसारीत केल्या परंतू त्यानंतर मात्र आता या हेलिकॉप्टर चा वापर लातूर शहरातील शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच सर्वसामान्य नागरिकांसाठी अत्यल्प दरात हवाई सफर देण्यात येणार असल्याची माहिती होती परंतू वास्तवात मात्र अता हे अल्प दर म्हणजे विमाना पेक्षा ही महाग असल्याची माहिती समोर आली आहे.विशेष म्हणजे हैद्राबाद-तिरूपती विमानाचे टिकिट ३००० आणि लातूर मध्ये हेलिकॉप्टर ची एक चक्कर ६०००, नेमके हे अल्प दर लावून हवाई सफरीच्या नावाखाली लातूरकरांची लूट करण्यात आल्याची जोरदार चर्चा सध्या लातूर शहरामध्ये होवू लागली आहे. लातूर जिल्ह्यात पर्यावरण संतुलन राखण्यासाठी म्हणुन वन्य भागात दि. २७ सप्टेंबर ते २९ सप्टेंबर रोजी हेलिकॉप्टरच्या माध्यमातून लाख बियांचे बीजारोपण (वड, चिंच, लिंब व पिंपळ) हे फक्त नावालाच होते कि काय...?असा प्रश्न सर्वसामान्य लातूरकरांमधून उमटू लागला आहे.खरे पाहता माननिय जिल्हाधिकारी यांना हेलिकॉप्टर मध्ये सोबत घेवून हे सामाजिक कार्य संपन्न झाल्याचे फोटो आणि व्हिडिओ समाजासमोर येणे अवश्यक असताना मात्र विद्यार्थ्यांचे हवाई सफरीचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाली.नेमेके या आयोजकांचा उद्देश जिल्ह्यातील पर्यावरण संतुलन राखण्यासाठी वन्य भागात हेलिकॉप्टरच्या माध्यमातून बियांचे बीजारोपण होता की हवाई सफर हेच मुळात लातूरकरांना समजले नाही,   त्यामुळे
 'बियाणी' हेलिकॉप्टर मधून टाकणार्यांनी सामाजिक उपकृमाचा अक्षरशः धज्जा उडवल्याचे सर्वसामान्य जनतेकडून बोलले जावू लागले आहे.
Previous Post Next Post