Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

भाजपा लातूर शहर जिल्ह्याच्या वतीने सेवा पंधरवाडा आढावा बैठक..

भाजपा लातूर शहर जिल्ह्याच्या वतीने सेवा पंधरवाडा आढावा बैठक.. 








                जगातील लोकप्रिय नेते,आपल्या देशाचे यशस्‍वी लोकप्रिय पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांच्‍या जन्‍मदिना निमित्‍ताने 17 सप्‍टेंबर ते 02 ऑक्‍टोबर पर्यंत भाजपाच्‍या वतीने संपूर्ण देशात सेवा पंधरवाडा साजरा केला जाणार आहेे  लातूर शहर जिल्‍हयात सेवा भावनेतून विविध कार्यक्रमाच्‍या माध्‍यमातून हा पंधरवडा साजरा केला जाणार असून या कार्यक्रमाच्‍या यशस्‍वीतेसाठी लातूर शहर भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष मा. गुरुनाथ जी मगे साहेब यांच्‍या प्रमुख उपस्थितीत बैठक संपन्न झाली ,या बैठकीत,शहर समित्या व प्रत्येक मंडलात ,समित्या स्थापण करून विविध कार्यक्रमाची जबाबदारी अनेकांना देण्‍यात आली.या मध्ये आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, स्वच्छता अभियान, होकल फॉर लोकल,पोस्ट कार्ड, जल ही जीवन, विविधता मे एकता, कोविड लसीकरण,खादी चा वापर,प्लास्टिक मुक्ती,आदी विषयी जिल्हा अध्यक्ष गुरुनाथ जी मगे साहेब यांनी सखोल असे मार्गदर्शन केले व मंडळातील,मंडल अध्यक्ष संयोजक ,सह संयोजक यांना वेगवेगळ्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या,
                अंत्‍योदयाचा संकल्‍प देत देशातील गोर गरीब शोषित व वंचित वर्गाच्‍या कल्‍याणाकरीता देशसेवेचे ध्‍येय साध्‍य करत विविध कल्‍याणकारी योजना समाजातील शेवटच्‍या घटकापर्यंत पोंहचविण्‍यासाठी समर्पीत भावनेने कार्य करणारे देशाचे यशस्‍वी पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी साहेब यांच्‍या जन्‍मदिना निमित्‍ताने 17 सप्‍टेंबर ते 02 ऑक्‍टोबर पर्यंत भाजपाच्‍या वतीने देशभर सेवा पंधरवाडा साजरा करण्‍यात येत असून लातूर जिल्‍हयात हा पंधरवाडा नाविन्‍यपुर्ण व्‍हावा यासाठी आयोजित कार्यक्रमाची सविस्‍तर माहिती लातूर शहर जिल्हा ,सेवा पंधरवाडा ,संयोजक श्री किशन बडगिरे यांनी दिली. या बैठकीच्‍या अध्‍यक्षस्‍थानी शहर जिल्‍हाध्‍यक्ष मा. गुरुनाथ जी मगे हे होते. यावेळी मंडल अध्यक्ष ,श्री रवीजी सुडे, श्री ज्योतिराम जी चिवडे,श्री अमोल जी गित्ते,,श्री गोरोबा गाडेकर,सौ शोभाताई पाटील,श्री देवाजी गडदे, सौ मीनाताई भोसले,, श्री किशोर जी काळे, श्री ओमजी धरणे ,श्री किशोरदादा जैन ,आफ्रिन खान,विकास बनसोडे, प्रसाद कुलकर्णी, दत्ता काळे,कुमार गोजमगोंडे,अरुण जाधव ,संदीप सोनवणे, सागर फतेपुरे,, श्रीनिवास मेणकुदळे, विकास घोडके, व सेवा पंधरवाडा समितीचे सदस्य व भाजपाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.प्रास्ताविक सेवा पंधरवडा संयोजक श्री किशन बडगिरे यांनी केले व आभार सह संयोजक ऍड विजय अवचारे यांनी केले
Previous Post Next Post