गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
वीज चोरी प्रकरणात कंत्राटदाराला महावितरणाचा दणका
उदगीर(संगम पटवारी) येथील शासकीय विश्राम गृहाच्या पाठीमागे असलेल्या बांधकाम विभागाच्या कार्यालयातून नवीन विभागीय अभियंता कार्यालयाच्या बांधकामासाठी उपअभियंता कार्यालयातून विजेची चोरी केल्याने महावितरणाने उपअभियंता बांधकाम विभाग व कंत्राटदार , कंञाटदाराचे अभियंता यांना ६० हजार ७४० रुपयाचे विजबिल देवुन महावितणाने दणका दिला आहे.
मलकापूर ता.उदगीर परिसरामध्ये माजी गृहराज्यमंत्री आमदार संजय बनसोडे यांच्या प्रयत्नातून मंजूरी मिळालेल्या बांधकाम विभागाच्या कार्यालयाचे काम चालू आहे . त्या कामासाठी सळई कापने व ईतर सर्व कामे उपअभियंता कार्यालयातून वीज चोरी करून केली जात होती . त्यामुळे उदगीरात कंञाटदार व उपअभियंता यांच्या विषयी विचिञ चर्चा चालू आहे .
"पञकारांनी उघडी केली विजचोरी"
पत्रकारातील आतिक्रमण हाटव या मागणीसाठी उपअभियंता कार्यालयासमोर एकदिवशीय आंदोलन करत असतांना बांधकाम विभागाच्या कार्यालयातून विज चोरी करुन काम करत असल्याने निदर्शनास आल्याने पञकारांनी महावितरणचे मुख्य अभियंता देशमुख यांना कळवल्यानंतर त्यांनी कर्मचारी उपअभियंता कुलकर्णी व मलकापूर परिसरात कार्यरत असलेले लाईनमन रणक्षेञे यांना पाठवून पंचनामा करुन गज कापण्यासाठी ठेवलेली मशीन जप्त करत कंत्राटदार व सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता यांच्या नावाने ६०७४० रुपयाचा दंड भरण्यासाठी लाईट बिल दिले आहे.
शेकडो कोटीचे काम करणार्या कंञाटदाराकडून विजचोरी
मतदार संघात शेकडो कोटीचे काम करणार्या कंञाटदार विज चोरी करुन कामे करत असल्याने उदगीरात कंञाटदाराविषयी संताप निर्माण झाला आहे .
कंञाटदाराचे उदगीर परीसरात किती कामे चालू आहेत .त्या कामावर किती दिवसापासून वीज चोरून घेत कामे चालू आहेत यानिमित्तिने याचीही चौकशी होणे महत्वाचे आहे .
उपअभियंता व कंञाटदार व महावितरणाची मिलिभगत
उपअभियंता कार्यालयातून कंञाटदार विज चोरुन घेवुन बांधकाम करत असल्याची बांधकाम विभागाचे अभियंता एल.डी. देवकर यांना माहिती नव्हती का? किती दिवसापासुन विज चोरी होत होती ,१५० रुपयासाठी सामान्य नागरिकांच्या घरची विज कापणार्या महावितरणाच्या कर्मचार्यांना कंञाटदाराच्या विजचोरी विषयी महिती नव्हती का? का या सर्वांना माहिती असुनही "एकमेका साह्य करु" या प्रमाणे सर्व चालू आहे .असे आनेक प्रश्न उदगीरकरांना पडले आहेत.